दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू व अभिनेता नागा चैतन्य ही मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी होती. २०१७ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. तर २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोट झाला असला तरीही दोघे त्यांच्या नात्यामुळे सातत्याने चर्चेत असतात. समंथाबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य दुसरं लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा- दाक्षिणात्य सुपरस्टार अडकला लग्नबंधनात; ‘या’ अभिनेत्रीबरोबर घेतले सात फेरे

Smriti Singh | स्मृती सिंग
“स्मृती सिंग यांनी प्रेमाच्या नावाखाली…”, शहीद अंशुमन सिंग यांच्या वडिलांचा गंभीर आरोप!
captain anshuman singh smriti singh viral video
शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांना मरणोत्तर किर्ती चक्र; वीरपत्नीनं सांगितला अखेरचा संवाद, म्हणाल्या, “आम्ही पुढच्या आयुष्याचे…”
Sunil Gavaskar 75th Birthday Special boundary hero who allowed the Laxman Line to cross
‘लक्ष्मणरेषा’ पार करू देणारा बाउंड्रीवीर…
Crime News
१५ वर्षांपूर्वी झालेल्या महिलेच्या हत्येचं रहस्य निनावी पत्रामुळे उलगडलं, कुठे घडली घटना?
seven month old baby swallowed three keys the doctors of Rajawadi Hospital saved the babys life
सात महिन्याच्या बाळाने गिळल्या तीन चाव्या, राजावाडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी वाचविले बाळाचे प्राण…
Chandrapur, Mother, poisoned,
चंद्रपूर : आधी पोटच्या गोळ्याला विष पाजले, मग स्वतः घेतला गळफास; त्या मातेने का उचलले टोकाचे पाऊल?
Nilesh Lanke Ahmednagar MP in Parliament took oath in english Sujay Vikhe Patil
“I, Nilesh Dnyandev Lanke…”; भाषेवरून हिणवलेल्या लंकेंची इंग्रजीतून शपथ, त्यांच्या कारकिर्दीवर एक नजर…
suborno bari worlds youngest professor
मूर्ती लहान पण किर्ती महान! कादंबरीकार आणि प्राध्यापक झाल्यानंतर आता होणार पदवीधर; कोण आहे १२ वर्षांचा चिमुरडा?

नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडले आणि २०१७ मध्ये लग्न केले. तब्बल चार वर्षांनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर नागा चैतन्यचे नाव अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबतही जोडले गेले. मात्र दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार नागा पुन्हा लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नागा चैतन्याचे वडील अभिनेते नागार्जुन आपल्या मुलाचं दुसर लग्न लावण्याचा विचार करत आहेत. परंतु नागा कोणत्या मुलीशी लग्न करणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. काही जणांच्या मते नागा चैतन्यची होणारी बायको अभिनय क्षेत्राशी संबंधित नसून एका व्यवसायिकाची मुलगी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप नागा चैतन्यकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही

हेही वाचा- ‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रेक्षक म्हणून सहभागी होण्यासाठी मोजावे लागतील ४ हजार ९९९ रुपये? सत्य सांगत कपिल म्हणाला…

दरम्यान, नागा चैतन्य सध्या अभिनेत्री शोभिता धुलिपालाला डेट करीत असल्याचे म्हटले जात आहे. तर, समांथा सिंगल आहे. नागा चैतन्यने ‘ कस्टडी’ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. समंथाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा शकुंतलम चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट म्हणावी तशी कमाई करु शकला नाही. आता ‘खुशी’ चित्रपटानंतर ती लवकरच ‘सिटाडेल इंडिया’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर वरुण धवनची मुख्य भूमिका आहे. बॉक्स ऑफिसवर ‘खुशी’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर समांथाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.