दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्य सध्या NC24 चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. नागाच्या NC24 चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून या चित्रपटासाठी तो खूप उत्साही आहे. नागाच्या NC24 चित्रपटाची कथा एका पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासाच्या विद्यार्थ्याभोवती फिरणारी आहे. सतयुग आणि कलियुग याचा मेळ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
‘थंडेल’ चित्रपटाच्या यशानंतर नागा चैतन्यने त्याचा आगामी चित्रपट NC24 ची घोषणा केली आहे. या चित्रपटात तो एका नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. हा एक पौराणिक थ्रिलर चित्रपट असून याचं दिग्दर्शन कार्तिक दांडू यांनी केलं आहे.
बीवीएसएन प्रसादने NC24 चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. चित्रपटात अॅक्शन आणि स्टंट सीन्स हैराण करणारे आहेत. तसंच यात व्हीएफएक्सचा अधिक वापर केला आहे. याबाबत स्वतः नागा चैतन्यने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. तसंच नागा म्हणाला होता की, चित्रपट खजिन्याच्या शोध आणि त्याच्याशी संबंधित साहसाभोवती फिरणारा आहे.

माहितीनुसार, NC24 चित्रपटामध्ये प्राचीन भविष्यवाणी वर्तमान काळाशी जुळताना दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाची कथा एका खजिन्याच्या शोधात, पुरातत्वशास्त्रज्ञाभोवती आणि इतिहासाच्या विद्यार्थ्याभोवती फिरणारी आहे. NC24 चित्रपटाची प्रेरणा अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भांमधून घेतली गेली आहे. ज्यामध्ये सतयुग आणि कलियुगाचे संदर्भ देखील आहेत, असं म्हटलं जात आहे.
दरम्यान, नागा चैतन्य या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. या चित्रपटाबद्दल तो म्हणाला होता की, मला विश्वास आहे की NC24 चित्रपटाकडे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक जोडण्याची क्षमता आहे. ही कथा चांगलं विरुद्ध वाईट आणि नियतीविरुद्धच्या लढाई या विषयावर आधारित आहे.