अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून तब्बूला ओळखले जाते. तिने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या तब्बूचे खासगी आयुष्य कायमच चर्चेचा विषय ठरले आहे. तब्बूच्या अफेअरच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांच्याबरोबरही तिचे नाव जोडण्यात आले होते. नागार्जुन आणि तब्बू हे दोघेही तब्बल १० वर्षे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे नागार्जुनची पत्नी अमाला यांना याबद्दल कल्पना होती, अशाही चर्चा अनेकदा समोर येत असतात. मात्र काही वर्षांपूर्वी अमाला यांनी नागार्जुन आणि तब्बूच्या नात्याबद्दल जाहीरपणे वक्तव्य केले होते.

नागार्जुन आणि तब्बू यांची ओळख एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. त्यावेळी ते दोघेही ऐकमेकांच्या प्रेमात पडले. नागार्जुन आणि तब्बूचे रिलेशनशिप जवळजवळ १० वर्षे सुरु असल्याचे म्हटले जात आहे. पण त्यावेळी नागार्जुन विवाहित होता. त्याने तब्बूला स्वत:च्या घराजवळ घर घेऊन दिल्याचे म्हटले जाते. नागार्जुनला तब्बूसोबतचे रिलेशन कायम ठेवायचे होते. पण त्याला पत्नीला घटस्फोटही द्यायचा नव्हता. तब्बूला मात्र हे मान्य नव्हते. यानंतर या दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यानंतर तब्बूने नागर्जुनमुळे लग्नच केले नाही, असे म्हटलं जाते.
आणखी वाचा : “माझ्यावर दडपण…” नागार्जुनबरोबरच्या नात्यावर तब्बूने भर कार्यक्रमात दिलेलं सविस्तर उत्तर

नागार्जुन आणि तब्बू यांचे मैत्रीपलीकडे असलेल्या नात्याची संपूर्ण कल्पना त्याची पत्नी अमाला यांना होती. ते दोघेही एकमेकांच्या फार जवळ आहेत, हे देखील त्यांना माहिती होते. काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत त्यांना याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी यावर मौन सोडले होते.

“तब्बू ही मुंबईत राहणाऱ्या अशा काही निवडक लोकांपैकी एक आहे, जिच्या मी कायमच संपर्कात असते. ती जेव्हा कधी हैद्राबादमध्ये फिरण्यासाठी येते, तेव्हा ती आमच्याच घरी थांबते. माझी ती एक उत्तम व्यक्ती आणि मैत्रीण आहे. आमच्या मैत्रीबद्दल जितके बोलू तितके कमीच आहे. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल लपवण्यासारखे माझ्याकडे काहीही नाही”, असे तब्बू म्हणाली.

आणखी वाचा : “मी २१ वर्षांचा आणि ती १६…”, तब्बूबरोबर नात्याची चर्चा रंगत असताना नागार्जुनने केलेले जाहीर वक्तव्य

तर दुसरीकडे नागार्जुनने “तब्बू माझी फार जुनी आणि चांगली मैत्रीण आहे. आमची मैत्री अनेक वर्षांपासून आहे. मी साधारण २१ किंवा २२ वर्षांचा होतो आणि ती फक्त १६ वर्षांची होती. म्हणजे आमच्या वयात बरेच अंतर होते” असे म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान नागार्जुन अभिनेत्री अमालासोबत चित्रपटांमध्ये काम करत होता. त्यांनी ऐशीच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी १९९२ मध्ये लग्न केले. १९९४ साली नागार्जुन दुसऱ्यांदा बाबा झाला. त्याच्या दुसऱ्या मुलाचे नाव अखिल अक्कीनेनी आहे.