सोनालीची तब्बेत सुधारतेय, मराठमोळ्या अभिनेत्रीनं घेतली भेट

लवकरच सोनाली बरी होऊन घरी परतेल असा विश्वास तिनं व्यक्त केला आहे.

कॅन्सरग्रस्त सोनाली सध्या अमेरिकेत उपचार घेत आहे. काही महिन्यांपूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं. त्यानंतर बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी प्रत्यक्ष अमेरिकेत जाऊन सोनाली भेट घेत तिच्या तब्येतीची विचारपूस केली. नुकतीच नम्रता शिरोडकर हिनं देखील सोनालीची भेट घेतली.

नम्रता अमेरिकेत सुट्ट्या व्यतीत करत आहे, सोनाली आणि नम्रता या त्याकाळच्या बॉलिवूडमधल्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. सोनालीची भेट घेत नम्रतानं अनेक आठवणींना उजाळा दिला. ‘मी आणि सोनाली मराठी आहोत त्यामुळे बऱ्याच गोष्टींवर आम्ही गप्पा मारल्या. तिची प्रकृती आता सुधारत आहे. लवकरच बरी होऊन ती घरी परतेल असंही नम्रता म्हणाली.

सोनालीच्या तब्येतीबाबत अधिक सकारात्मक नम्रता दिसली. सोनालीला जुलै महिन्यात हाय- ग्रेड कॅन्सरचं निदान झालं. त्यानंतर उपचारासाठी ती अमेरिकेत गेली. अक्षय कुमार, सुझान खान, प्रियांका चोप्रा, नितू सिंगनं नुकतीच तिची भेट घेतली. अभिनेते अनुपम खेरही वेळ मिळेल तशी सोनालीची भेट घेतात. एका मालिकेच्या चित्रीकरणासाठी अनुपम खेर अमेरिकेतच आहेत. त्यामुळे चित्रीकरणातून फावला वेळ मिळाला की ते सोनालीसोबत वेळ व्यतीत करतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Namrata shirodkar meets sonali bendre in new york

ताज्या बातम्या