नाना पाटेकर यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर या मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमनासाठी सज्ज झाल्या आहेत. आगामी ‘बर्नी’ या चित्रपटाद्वारे नीलकांती या पुनरागमन करत आहेत.
तब्बल २८ वर्षानंतर नीलकांती यांचे चित्रपटसृष्टीत पुनरागमन होत आहे. त्यांनी यापूर्वी काही मालिकांमध्ये काम केले असून, सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘आत्मविश्वास’ (१९८९) या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. केवळ याच चित्रपटात त्यांनी आधी काम केले होते. त्यानंतर आता नीलिमा लोणारी दिग्दर्शित बर्नी चित्रपटात त्यांच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहता येणार आहे. प्रा. सुभाष भेंडे यांच्या ‘जोगीण’ या कादंबरीवरून प्रेरित होऊन ‘बर्नी’ या चित्रपटाच्या कथेचा विस्तार आणि पटकथा नीलिमा लोणारी यांनी लिहिली आहे. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार असून तिच्या आईची भूमिका नीलकांती यांनी साकारली आहे.
‘बर्नी’ हा चित्रपट येत्या १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र प्रदर्शित होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2016 रोजी प्रकाशित
Nana Patekar wife NeelKanti : नाना पाटेकर यांच्या पत्नीचे चित्रपटसृष्टीत पुनरागमन
'आत्मविश्वास' या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 23-05-2016 at 15:29 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patekars wife neelkanti comeback after 28 years