इमरानसोबत चित्रीत केलेल्या चुंबनदृश्यांच्या रिटेक्सवर नर्गिस संतापली

दिग्दर्शकाने चुंबनदृश्ये पुन्हा पुन्हा चित्रीत करायला सांगणे हे हास्यास्पद आहे

तुमच्यासोबतचा कलाकार समजूतदार असेल तर चुंबनदृश्य चित्रीत करताना सोपे जाते. इमरान खरंच खूप विनम्र आणि तरबेज अभिनेता आहे. त्याने चित्रीकरणावेळी माझ्यावर दडपण निर्माण होऊ दिले नाही, असेही नरगिस पुढे म्हणाली.

बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मीसोबत ‘अझर’ या आगामी चित्रपटात चित्रीत केल्या गेलेल्या चुंबनदृश्यांच्या रिटेक्सवर चित्रपटातील मुख्य अभिनेत्री नर्गिस फाख्री हिने संताप व्यक्त केला. भारतीय संघाचा माजी कर्णधार अझरुद्दीन यांच्या जीवनावर आधारीत या चित्रपटात अझरुद्दीन यांची भूमिका साकारणाऱया इमरान हाश्मी आणि अभिनेत्री नर्गिस यांची काही चुंबनदृश्ये चित्रीत करण्यात आली आहेत. मात्र, दिग्दर्शकाने चुंबनदृश्ये पुन्हा पुन्हा चित्रीत करायला सांगणे हे हास्यास्पद आहे, असे नरगिस म्हणाली.

पाहा ‘अझर’ चित्रपटाचा ट्रेलर!

चित्रपटात चुंबनदृश्ये असणार आहेत याची मला कल्पना देण्यात आली नव्हती. चुंबनदृश्यांचे रिटेक्स आणि रिशूट करणं म्हणजे काही विनोद आहे का? चुंबनदृश्यांचे इतके रिटेक्स घेण्यात आले की चित्रपटासाठीचे मानधन खरतरं मी वाढवून घ्यायला हवे होते, असे नर्गिसने म्हटले. याशिवाय, चुंबनदृश्य चित्रीत करणे माझ्यासाठी खूप कठीण गोष्ट आहे. कारण, त्यावेळी माझ्यावर खूप दडपण येते. मग टेक चांगला व्हावा आणि दडपण दूर व्हावे यासाठी मी सेटवर इतरांना विनोद सांगते. तुमच्यासोबतचा कलाकार समजूतदार असेल तर चुंबनदृश्य चित्रीत करताना सोपे जाते. इमरान खरंच खूप विनम्र आणि तरबेज अभिनेता आहे. त्याने चित्रीकरणावेळी माझ्यावर दडपण निर्माण होऊ दिले नाही, असेही नर्गिस पुढे म्हणाली.
दरम्यान, ‘अझर’ हा चित्रपट येत्या १३ मे रोजी चित्रपटगृहात दाखल होत असून चित्रपटात इमरान आणि नर्गिस सोबतच प्राची देसाई, गौतम गुलाटी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nargis fakhri found ridiculous to reshoot kissing scenes in azhar with emraan hashmi

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या