अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या ‘सच कहूं तो’ या आत्मचरित्रामुळे चांगल्याचं चर्चेत आल्या आहेत. १४ जूनला त्यांचं हे पुस्तक प्रकाशित झालं असून वाचकांची पुस्तकाला पसंती मिळताना दिसतेय. या पुस्तकात नीना गुप्ता यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. यातीलच एक महत्वाची गोष्टी म्हणजे त्यांच्या आयुष्यातील पहिला रोमॅण्टिक क्षण. नीना गुप्ता यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिल्या रोमॅण्टिक क्षणांचं वर्णन करत असतानाच त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याचाही खुलासा केलाय.
नीना गुप्ता यांनी त्यांच्या पहिल्या अफेअर बद्दल या पुस्तकात खुलासा केलाय एवढचं नव्हे तर जेव्हा नीना गुप्ता यांच्या आईला या अफेअर बद्दल कळलं तेव्हा काय घडलं याचा उलगडा देखील त्यांनी ‘सच कहूं तो’मध्ये केलाय. नीना गुप्ता करोल बागमधील त्यांचं घर सोडून त्यांच्या नव्या घरी राहिल्या गेल्या. तेव्हा त्या १५ वर्षांच्या होत्या. यावेळी शेजारीच राहणाऱ्या बाबू (नाव बदललेलं) या मुलाशी त्यांची पहिली भेट झाली. खरं तर सुरुवातील त्यांच्यात काहीच बोलणं नव्हत. त्याकाळी केवळ नजरे नजरेतून संवाद साधला जात असं नीना गुप्ता पुस्तकात म्हणाल्या आहेत.
आणखी वाचा: “मी या २-४ लोकांना का महत्व देऊ?”; शॉर्ट्समुळे ट्रोल करणाऱ्यांना नीना गुप्ता यांचं उत्तर
नीना गुप्ता यांनी त्यांच्या पुस्तकात त्यांच्या कोवळ्या वयातील त्या भावनांचं वर्णन केलंय.’रस्त्यावरून जात असताना, मित्र मैत्रिणींंसोबत गप्पा मारत असताना डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहूनच आम्ही समाधान मानायचो” असं त्या म्हणाल्या आहेत. तसचं नेमक्या नीना गुप्ता जेव्हा गच्चीवर जात तेव्हा बाबू तिथे पोहचलेला असतं. मैत्रिणी आईला तक्रार करतील या भितीने नीना गुप्ता यांनी त्यांच्या मनात बाबूबद्दल असलेल्या प्रेमाबद्दल मैत्रीणींना देखील कल्पना दिली नव्हती.
View this post on Instagram
आणखी वाचा: ४० वर्ष वाट पाहिल्यानंतर अखेर नीना गुप्ता यांना बिग बींसोबत काम करण्याची संधी मिळाली !
…आणि अफेअरचा शेवट असा झाला
त्यानंतर कालांतराने धाडस करत नीना गुप्ता किराणा दुकानात बाबूला भेटू लागल्या. थोडं धाडसं करून ते बोलू लागले. मात्र कुठे संभाषणाला सुरुवात झाली असतानाच नीना गुप्ता यांच्या आईने त्यांना पकडलं. एके दिवशी नीना गुप्ता गच्चीवर बाबूसोबत इशारे करून बोलत होत्या. दोघेही कुठल्यातरी विषयावर हसत असतानाच नीना गुप्ता यांच्या आई तिथे पोहचल्या. आईने नीना गुप्ता यांना ओढत घरात नेलं आणि त्यांनी नीना गुप्ता यांना चांगलच खडसावलं. त्या दिवशीच नीना गुप्ता यांच्या नुकत्याच सुरु झालेल्या अफेरचा शेवट झाला.
“तेव्हा पासून माझी आई म्हणजे एखदी कडक अधिकारी असल्याचं मला वाटू लागलं आणि मी तिच्या कधीच वाट्याला गेले नाही.” असं नीना गुप्ता म्हणाल्या आहेत.
नीना गुप्ता यांनी त्यांच्या या पहिल्या अफेअरसोबतच कालांतराने त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घडामोडी आणि नातेसंबधांवर भाष्य केलंय.