सोनी टीव्हीचा सिंगिंग रिअलिटी शो ‘इंडियन आयडॉल १३’ ने छोट्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन केले आहे. शनिवारी, १० सप्टेंबरला या शोची दमदार सुरुवात झाली. इंडियन आयडॉल १३ मध्ये नेहा कक्कर विशाल ददलानी आणि हिमेश रेशमियाने स्टेजवर परीक्षक म्हणून दिसले. मात्र, शो सुरू झाल्यानंतर सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नेहा कक्कर एका स्पर्धकला पाहून आश्चर्यचकित झालेली दिसत आहे आणि त्याला पाहून ती शोची परीक्षक म्हणून काम करण्यास नकार देताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या रिअलिटी शोच्या प्रोमोमध्ये विनीत सिंग नावाचा एक स्पर्धक हातात गिटार घेऊन स्टेजवर येतो. नेहा त्याला पाहून आश्चर्यचकित होते. त्याचबरोबर ती खूप आनंदी झालेली दिसते. यादरम्यान नेहाने खुलासा केला की, ‘यापूर्वी विनीत सिंग एका शोमध्ये आला होता आणि तो शोचा स्टार बनला होता. म्हणूनच ती त्याची परीक्षक म्हणून काम पाहू शकत नाही.’ विनित सिंगने याआधीही सिंगिंग रिअलिटी शो जिंकला आहे.
आणखी वाचा-रणबीर- आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच ओटीटीवर, कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट?

नेहाचं बोलणं ऐकून विनीत भावूक होतो. विनीत म्हणतो, “नेहा आज जिथे आहे ती तिच्या स्वतःच्या ताकदीमुळे आणि मेहनतीमुळे. तिनेही मला जज करावं अशी माझी इच्छा आहे.” त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी नेहा, “विनीत, तू गा” असं म्हणताना दिसते. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोनी टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘परीक्षक नेहा तिच्या जुन्या मित्राला भेटली. तेही इंडियन आयडॉलच्या मंचावर.

आणखी वाचा-रिअॅलिटी शोमध्ये रडण्यावरून ट्रोल होणारी नेहा कक्कर म्हणाली, “शो मजेदार बनवण्यासाठी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंडियन आयडॉल सीझन १३ चा पहिला भाग ऑडिशन राउंड होता, जिथे हजारो स्पर्धक सिंगिंग रिअलिटी शोमध्ये नशीब आजमावण्यासाठी उपस्थित होते. एपिसोडची सुरुवात एका कॉन्सर्ट स्टेडियमसारख्या सेटअपमध्ये परीक्षकांच्या परिचयाने झाली. आदित्य नारायण हा शो होस्ट करत आहे.