नेहा शर्मा ही बॉलिवूडची आजची एक आघाडीची अभिनेत्री असून, एफएचएम मासिकाची कव्हर गर्ल होण्याचा मान तिला मिळाला आहे. कुठल्याही हॉट मॉडेलला स्पर्धा देणारी नेहा प्रत्यक्षात एक नन होणार होती. एफएचएमच्या या आवृत्तीत तिने या मागची कथा सांगितली. ‘क्या सुपर कुल है हम’, ‘जयंता भाई की लव स्टोरी’ आणि ‘यमला पगला दीवाना -२’ सारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले असून, नेहा बॉलिवूडमध्ये झपाट्याने आपले स्थान निर्माण करत आहे. या स्वरूप सुंदरीने ‘गुगल झेटगेस्ट लिस्ट ऑफ फास्टेस्ट रायझिंग पिपल’च्या भारतासाठीच्या यादीत पाचवे स्थान पटकावल्याची फार कमी लोकांना माहिती आहे.