बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सातत्याने चर्चेत असते. प्रियांकाने नुकताच तिचा ४०वा वाढदिवस साजरा केला. पती निक जोनास आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह मॅक्सिकोमध्ये जल्लोषात तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तिच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता याच सेलिब्रेशनमधला नवा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – निक जोनसने प्रियांकाला दिले हटके टोपणनाव, फोटो शेअर करत म्हणाला…

प्रियांकाच्या वाढदिवसाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कंमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांका वाढदिवसाच्या पार्टीचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये निक जोनस आणि प्रियांका एकमेकांना किस करताना दिसत आहेत.
तसेच निक जोनस हा प्रियांकाची आई आणि त्याची सासू मधू चोप्रा यांच्याबरोबर डान्स करताना दिसत आहे. तर प्रियांका चोप्रा देखील बीचवर डान्स करताना दिसत आहे.

आणखी वाचा – प्रियांका, आलिया आणि कतरिनासोबत ‘जी ले जरा’मध्ये झळकणार ‘हा’ अभिनेता; चर्चांना उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियांका सध्या तिच्या हॉलिवूड प्रोजेक्ट ‘सिटाडेल’वर काम करत आहे. ही एक आगामी वेब सिरीज आहे, ज्याचे दिग्दर्शन ‘अ‍ॅव्हेंजर्स’ फेम रुसो बंधूंनी केले आहे. प्रियांका व्यतिरिक्त या OTT शोमध्ये रिचर्ड मॅडेन देखील दिसणार आहे. ती पुढच्या वर्षी ‘जी ले जरा’ या हिंदी चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे.