scorecardresearch

वयाच्या ५८व्या वर्षी अभिनेत्याने केले पाचव्यांदा लग्न, ३१ वर्षांनी लहान पत्नीविषयी म्हणाला…

त्याने एका मुलाखतीमध्ये पाचव्या पत्नीविषयी वक्तव्य केले आहे.

हॉलिवूड चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणजे निकोलस. ‘घोस्ट रायडर’ या चित्रपटातून अनेकांच्या मनात घर करणाऱ्या निकोलसचे जगभरात चाहते आहेत. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. तो त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. निकोलसने काही दिवसांपूर्वी वयाच्या ५८व्या वर्षी पाचव्यांदा लग्न आहे. आता त्याने एका मुलाखतीमध्ये पत्नीविषयी वक्तव्य केले आहे.

निकोसने नुकतीच लॉस एन्जलस टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला त्याच्या आवडीच्या तीन गोष्टी निवडण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी त्याने सर्वात पहिले पाचवी पत्नी रिको शिबाटाची निवड केली. त्यावेळी तो म्हणाला, मला अखेर योग्य लाइफ पार्टनर मिळाला आहे. तसेच शिबाना आणि मी एका बाळाचा देखील विचार करत आहोत असे तो म्हणाला.
Video: रितेश देशमुखने केले ‘एक्स’ विषयी भाष्य, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

निकोलसने काही दिवसांपूर्वीच पाचव्यांदा लग्न केले. ते ही त्याच्या पेक्षा ३१ वर्षांनी लहान असणाऱ्या जपानी गर्लफ्रेंड रीको शिबाटासोबत. रीको ही २६ वर्षांची आहे. १६ फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाहसोहळा लॉस वेगसमधील एका हॉटेलमध्ये काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. पण निकोलसने त्याच्या लग्नाबाबतची माहिती मीडियाला दिली नव्हती. निकोलसच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी १६ फेब्रुवारी रोजी निधन झाले होते. म्हणून त्याने याच दिवशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जाते.

निकोलसने लग्नानंतर एक पार्टी आयोजीत केली होती. या पार्टीला त्याच्या एक्स पत्नी Alice Kimने हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्यासोबत तिचा १५ वर्षांचा मुलगा Kal-El देखील हजर असल्याचे म्हटले जाते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nicolas cage told his fifth wife the perfect partner riko shibata avb

ताज्या बातम्या