प्रेक्षकांकडून दाद मिळणं, कौतुकाची थाप पाठीवर मिळणं ही एखाद्या कलाकारासाठी खूप महत्त्वाची बाब असते. जेव्हा रसिक प्रेक्षक एखादी कलाकृती पाहून भारावून जातात आणि त्या कलाकाराला त्याच्या कामाची खरी पावती देतात, त्याच्या कामाचं भरभरून कौतुक करतात, तेव्हा रसिकांना माय बाप मानणार्‍या कलाकारालासुध्दा त्याच्या कामाचं, कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं. अशीच एक घटना निखिल राऊत या अभिनेत्यासोबत घडली आहे.

‘चॅलेंज’ या नाटकात तो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारत आहे. या नाटकाच्या एका प्रयोगाच्या वेळी त्याचं अभिनय पाहून प्रेक्षक इतके भारावले की, प्रयोगानंतर प्रेक्षकांनी निखिलला भेटून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यासोबतच या नाटकाने भारावलेल्या एका प्रेक्षकाने या नाटकाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि निखिलला आशिर्वाद म्हणून पैशांचं पाकीट दिलं. काही सावरकरप्रेमी तर प्रयोगानंतर अक्षरश: निखिलच्या पाया पडू लागले.

Bigg Boss Marathi : ‘खुर्ची सम्राट’ खेळाचा विजेता कोण ठरणार?

प्रेक्षकांच्या या प्रेमाविषयी निखिल सांगतो की, ‘कोणताही कलाकार हा आपली कलाकृती श्रद्धेनं, मेहनतीनं सादर करीत असतो. रंगभूमीची अगदी मनापासून आणि निष्ठेने सेवा करीत असतो, त्यावेळी रंगभूमीसुद्धा त्याला भरभरून देत असते. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे मी भारावून गेलोय, परंतु प्रयोगागणिक मिळणाऱ्या या प्रेमामुळे जबाबदारी वाढल्याची जाणीवदेखील होत आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.