निलेश साबळेने पाया पडून मागितली नारायण राणेंची माफी; जाणून घ्या कारण

निलेश साबळे ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोचे सूत्रसंचालन करतो.

nilesh sable, narayan rane,
निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोचे सूत्रसंचालन करतो.

छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ हा शो लोकप्रिय मराठी कॉमेडी शो आहे. सध्या हा कार्यंक्रम एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या शोमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पात्र दाखवण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात संताप व्यक्त केला गेला. नारायण राणेंची बदनामी होईल असं पात्र रंगवण्यात आलं, असा आरोप राणेंच्या समर्थकांनी केला होता. त्यानंतर कार्यक्रमाता सूत्रसंचालक निलेश साबळे आणि त्यांच्या टीमने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेत दिलगिरी व्यक्त केली.

निलेश साबळे आणि कार्यक्रमातील काही सहकाऱ्यांनी मिळून राणेंच्या अधिश निवासस्थानी भेट घेतली आणि नारायण राणे यांची पाया पडून माफी मागितली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दिवाळी अधिवेशन’ या कार्यक्रमात राणे यांचे पात्र दाखविण्यात आले होते. या पात्रावर राणेंच्या समर्थकांनी आक्षेप नोंदविला होता. अनेकांच्या भावना दुखावल्या होत्या. त्यानंतर राणेंच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी झी टीव्ही आणि निलेश साबळेला फोन करून संताप व्यक्त केला होता. त्यामुळे साबळे व टीमने राणे यांची भेट घेतली. त्यांनी राणे यांच्या ‘अधिश’ या निवासस्थानी जात दिलगिरी व्यक्त केली. यावेळी आमदार नितेश राणेदेखील उपस्थित होते.

आणखी वाचा : प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाच्या चर्चेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. आमच्या टीमकडून पुन्हा अशी चूक होणार नाही,” असं निलेश साबळेने यावेळी म्हटलं. ‘चला हवा येऊ द्या’ हा कॉमेडी शो संपूर्ण महाराष्ट्रात पाहिला जातो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nilesh sable and chala hawa yeu dya team apologize narayan rane dcp

ताज्या बातम्या