छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये काम करणारा अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद सुरु आहे. निशाने करणवर घरगुती हिंसाचार आणि त्याचे विवाहबाह्य संबध असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे करण म्हणतो की निशा बायपोलर असून ती पोटगीची मोठी रक्कम मागतं आहे.

मंगळवारी एका मुलाखतीत निशाने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. निशाने बायपोलर असल्याचे कबूल केले. “मी पागल नाही. २०१४ मध्ये मी ५ महिन्यांची गर्भवती होती आणि माझा गर्भपात झाला होता. त्यावेळी करण मला मारहाण करायचा. तर मी डॉक्टरांना जाऊन भेटली. मानसिक आरोग्याविषयी जागरूकता असणे खूप महत्वाचे आहे. करणमुळे मी नैराश्यात गेली होती,” असं निशा म्हणाली.

निशा पुढे म्हणाली, “मी कोणत्या ही प्रकारची औषध घेत नव्हती. मी घेतलेला शेवटचा डोस हा एंजायटीचा होता. डॉक्टरांना भेटायला, जीममध्ये जायला किंवा कोणाला ही भेटायचे असेल तर करण मला थांबवायचा.”

आणखी वाचा : “पत्नीच्या भावाने CCTV बंद करुन मारले आणि आता…”,करण मेहराने सांगितली त्या रात्रीची कहाणी

त्यानंतर आता दोघांच्या भांडणासाठी करणचं अफेअर कारणीभूत असल्याचा खुलासा तिने केला आहे. करणचे विवाहबाह्य संबध असून यामुळे अनेक वर्षांपासून नात्यात तणाव आल्याचं ती म्हणाली आहे.