बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरच्या बिग बॉस ओटीटी या शोमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती तिच्या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. अनेकदा तिला तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. आता उर्फीने परिधान केलेल्या टीशर्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या टीशर्टवर जावेद अख्तर यांचे नाव लिहिण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद ही जावेद अख्तर यांची नात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता उर्फीने विमानतळावर जाताना घातलेल्या टीशर्टने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘मी जावेद अख्तर यांची नात नाही’ असे लिहिलेला टीशर्ट उर्फीने परिधान केला आहे. तिच्या या टीशर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान उर्फीने हातात भगवद् गीता घेतल्याचे दिसत आहे. सध्या उर्फीचा हा लूक चर्चेत आहे.
आणखी वाचा : …म्हणून सुष्मिता सेनचा झाला ब्रेकअप, स्वत: सांगितले कारण

उर्फीला तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. तिचे कपडे कधी एवढे विचित्र असतात की तिचा ड्रेस डिझायनर कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. एका यूजरला उत्तर देत उर्फीने मजेशीर अंदाजात उंदीर असे म्हटले होते. उर्फी कधीही ट्रोलिंगकडे लक्ष देत नाही. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सतत चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.