मराठी चित्रपटसृष्टीत गाजविणा-या अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर या सध्या हिंदीतील मालिकांमध्ये काम करताना दिसत आहेत. ‘दिल्ली वाली ठाकूर गर्ल्स’, ‘एक नणंद की खुशियो की चाबी.. मेरी भाभी’, ‘ससुराल गेंदा फूल’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी आईची भूमिका साकारली आहे. मात्र, अद्याप आजीची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तयार नसल्याचे सुप्रिया यांनी म्हटले आहे.
याविषयी बोलताना सुप्रिया म्हणाल्या की, छोट्या पडद्यावर आईची व्यक्तिरेखा ही खूप महत्त्वाची आहे. मी यापूर्वी साकारलेल्या आईच्या भूमिका या लोकांवर सकारात्मक प्रभाव करून गेल्या. त्यामुळे मला सतत अशाच भूमिकेकरिता विचारणा करण्यात आली. आईची भूमिका साकारणा-या आताच्या अभिनेत्री या जवळपास त्यांच्या ऑनस्क्रीन वयाच्या मुलाच्या असतात. पण माझ्याबाबत तसे नसून, मालिकेतील माझी व्यक्तिरेखा माझ्या वयाला साजेशी आहे. मी खरंच आभारी आहे की मला अद्याप आजीच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आलेली नाही आणि इतक्यात तरी मी तशी भूमिका साकारणारसुद्धा नाही.
आजपासून सोनी वाहिनीवर सुरु होणा-या ‘कुछ रंग प्यार के एसे भी’ या मालिकेत सुप्रिया पिळगावकर दिसणार आहेत.