या आठवड्याच्या सुरुवातीला अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या बनावट व्हिडीओवर अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक कलाकार व चाहत्यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. केंद्र सरकारनेही संबंधित प्लॅटफॉर्म्सना हे फेक व्हिडीओ हटवण्यास सांगितलं होतं. या डीपफेक व्हिडीओ प्रकरणावर आता मूळ व्हिडीओतील तरुणीने प्रतिक्रिया दिली आहे.

“लोकांसाठी सहज उपलब्ध असलेली…”, रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओवर विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्या मुलीचा चेहरा हुबेहुब रश्मिकासारखा आहे. या व्हिडीओमध्ये ती मुलगी लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे आणि तिने डीपनेक शॉर्ट ड्रेस घातला आहे. या व्हिडीओत दिसणारी मुलगी ही रश्मिका नाही तर झारा पटेल आहे. झारा ही ब्रिटिश-भारतीय तरुणी आहे. एआयचे डीपफेक तंत्रज्ञान वापरून झाराच्या व्हिडीओवर रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला होता.

रश्मिका मंदानाने स्वतःच्या ‘त्या’ आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओबाबत सोडलं मौन, म्हणाली…

झारा पटेलची प्रतिक्रिया –

“कोणीतरी माझ्या शरीराचा आणि एका लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्रीचा चेहरा वापरून डीपफेक व्हिडीओ तयार केला आहे, असं माझ्या लक्षात आलं आहे. डीपफेक व्हिडीओमध्ये माझा कोणताही सहभाग नव्हता. जे घडत आहे त्यामुळे मी खूप व्यथित आणि अस्वस्थ आहे. मला स्त्रिया आणि मुलींच्या भविष्याची काळजी वाटते, कारण त्यांना आता सोशल मीडियावर वावरायची भीती वाटते. कृपया तुम्हाला इंटरनेटवर जे काही दिसते ते एकदा तपासा. कारण इंटरनेटवर दिसणारं सर्व काही खरं नाही. जे काही घडत आहे त्यामुळे मी खूप अस्वस्थ आहे,” असं झाराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं.

Video: रश्मिका मंदानाचा आक्षेपार्ह बनावट व्हिडीओ व्हायरल, अमिताभ बच्चन यांची कायदेशीर कारवाईची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रश्मिका मंदानाने व्यक्त केली होती नाराजी-

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रश्मिकाने एक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली होती. “माझा डीपफेक व्हिडीओ ऑनलाइन मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, हे पाहून मला खूप दुःख झालंय. याबद्दल बोलणं गरजेचं आहे. हे फक्त माझ्यासाठीच नाही तर आपणा सर्वांसाठीच धक्कादायक आहे, कारण तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे,” असं तिने म्हटलं होतं. तसेच याप्रकरणी पाठिंबा देणाऱ्यांचे तिने आभार मानले होते.