scorecardresearch

Oscar Awards 2023 : “खरा भारतीय…” ऑस्कर सोहळ्यातील ज्यु. एनटीआरच्या देसी लूकचं कौतुक; व्हिडीओ व्हायरल

Oscar 2023 Awards: ऑस्कर सोहळ्यातील ‘आरआरआर’ चित्रपटातील टीमचा देसी लूक व्हायरल

jr ntr
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

95th Academy Awards 2023 : ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं होतं आणि आज झालेल्या सोहळ्यात गाण्याने हा पुरस्कार जिंकला आहे. ‘नाटू नाटू’ गाण्याला नॉमिनेशन मिळाल्यानंतर संपूर्ण भारतीय यंदाच्या ऑस्करसाठी उत्सुक होते. ‘आरआरआर’ चित्रपटाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. या पुरस्कार सोहळ्याला चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. मात्र अभिनेता जुनियर एनटीआरच्या ड्रेसने सगळयांचे लक्ष वेधून घेतले.

ऑस्करसाठी राम चरण व ज्यु. एनटीआरने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खास लूक केला आहे. जुनियर एनटीआरच्या ड्रेसवर वाघाचे चित्र आहे. त्यावरून ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान त्याला विचारण्यात आले असता तो असं म्हणाला, “तुम्ही हा वाघ ‘आरआरआर चित्रपटात पहिला नाही का? जो माझ्या अंगावर उडी मारतो.” तेव्हा त्याला विचारण्यात आले “ही कल्पना कोणाची?” त्यावर तो असं म्हणाला, “गौरव गुप्ता या माझ्या फॅशन डिझायनर मित्राची कल्पना आहे. आम्ही जेव्हा यावर चर्चा केली तेव्हा असं ठरलं की आपण फक्त या रेड कार्पेटवर चालणार नाही तर आमच्या देशाचे प्रतिनिधीत्व करणार आहोत. म्हणून मी भारतीय वेशात आलो आहे आणि वाघ हा आमचा राष्ट्रीय प्राणी आहे.” तो पुढे म्हणाला “मला खूप अभिमान आणि आनंद झाला आहे.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

Oscars Awards 2023 : धोतर, कुर्ता अन्…; ऑस्कर सोहळ्यातील राजामौलींचा देसी लूक चर्चेत

अभिनेत्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहले “खरा भारतीय,” तर दुसऱ्याने लिहले आहे “आम्हाला तुझा अभिमान आहे” तर तिसऱ्याने लिहले आहे, “खूपच उत्तम कामगिरी चित्रपटाच्या टीमने केली आहे.” अनेकांनी टीमचं अभिनंदन केलं आहे.

राजामौली दिग्दर्शित आरआरआर हा चित्रपट २४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. ज्यु. एनटीआर व राम चरण मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने केवळ देशभरात नाही तर जगभरात डंका वाजवला होता. ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याची क्रेझ आजही कायम आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगण या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 11:08 IST
ताज्या बातम्या