चित्रपसृष्टीमधील सर्वाधिक मानाचा समाजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा येत्या ९ फेब्रुवारी रोजी डॉल्बी थिएटर येथे पार पडणार आहे. ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्यांना खास गुडी बॅग देण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी ही गुडी बॅग अवॉर्ड नाईटच्या आधी देण्यात येणार आहे. या बॅगमध्ये देण्यात येणाऱ्या गिफ्ट्सची एकूण किंमत १.२ कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे.
एका पत्रकार परिषधेत गुडी बॅगमध्ये देण्यात येणाऱ्या गिफ्टचा खुलासा करण्यात आला. यामध्ये Millianna ब्रँडचे कानातले, २४ कॅरेट सोन्याचे पेन आणि १२ दिवसांची क्रूझ टूर या गोष्टींचा समावेश आहे. या टूरची किंमत ५५ लाख ($ 78,000) रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच यामध्ये कोडा सिग्नेचरचे कॅनबिस इनफ्यूज्ड चॉकलेट देखील आहेत. हे चॉकलेट २४ कॅरेट सोने, जांभळ्या रंगाची ब्राझीलीयन चिकनमाती आणि नारळाच्या दूधापासून बनवण्यात आले आहेत. या गुडी बॅगमध्ये मेडिटेशन हॅन्ड बॅग आणि यूरिन कलेक्टर देखील देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त एक वर्षांचे ‘लिवइटअप’ (LiveItUp)चे सदस्यत्व देण्यात येणार आहे.
यंदाच्या नामांकन मिळालेल्या स्पर्धकांना मील किट, न्यूट्रीशन बार, अरोमाथेरपीचे गिफ्ट सेट देखील देण्यात येणार आहेत. या सेटमध्ये स्लीप सपोर्ट रोलबॉल, हनी मिंट लीप बाम आणि बॉडी ऑइल देण्यात येणार आहे.
या गोष्टींचा देखील समावेश गुडी बॅगमध्ये असून शकतो
-गोल्ड सिल्वर मून ब्रेसलेट
-१० खासगी सराव सत्र
-जॉन थॉमन यांचे स्टेन्ड ग्लास पोट्रेट
-कॉकटेल-मॉकटेलमध्ये वापरण्यात येणारे सीरप
-२५ हजार डॉलरपर्यंतची बोटॉक्स ट्रीटमेंट
-स्पेनच्या लाइट हाउसमध्ये राहणे
-ओल्ड स्पाइसचे डियोड्रंट
-बुलेट प्रूफ सिक्योरिटी डोअर