Biggest Grossing Horror Movie: विनोदी, भयपट, अॅक्शन, रोमँटिक असे वेगवेगळे जॉनर असलेले चित्रपट प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतात. काहींना विनोदी चित्रपट आवडतात. काहीजण भयपट पाहण्यास प्राधान्य देतात. तर काहीजण रोमँटिक चित्रपट पाहण्यात रमून जातात.

आज आपण अशा एका चित्रपटाबद्दल जाणून घेऊयात, ज्या चित्रपटाने मोठी कमाई करत सर्वांना आश्चर्यचकित केले होते. हा चित्रपट एक हॉरर चित्रपट होता. १ तास ५० मिनिटांच्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. विशेष बाब म्हणजे बॉक्स ऑफिसवरही मोठा गल्ला जमवला होता.

बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड मोडत कमावेलेले ३४०० कोटी

आता हा कोणता चित्रपट आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असलेच. तर ८ वर्षे या जुन्या चित्रपटाबद्दल जाणून घेऊयात. ही गोष्ट आहे प्राचीन इजिप्तच्या राजकुमारीची, जी सत्ता मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असते. तिच्या लोभी स्वभावामुळे ती तिच्या कुटुंबालासुद्धा मारुन टाकते आणि एक दिवस अंधाराच्या देवाबरोबर शक्ती मिळवण्यासाठी एक सौदा करते.

मात्र, जेव्हा तिचे सत्य सर्वांसमोर येते, तेव्हा तिला जिवंत दफन केले जाते. अनेक वर्षांनंतर चुकून तिची कबर उघडते. त्यानंतर ती जिवंत होते आणि मृ्त्यूचा खेळ सुरू होतो. ‘द मम्मी’ असे या चित्रपटाचे नाव आहे.

अनेक लोकप्रिय कलाकारांनी एकत्र येऊन या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली होती. यामध्ये डेविड कोएप, क्रिस्टोफर मॅकक्वेरी आणि डायलन कुस्मन या लेखकांचा समावेश होता. कर्ट्ज़मॅनने या चित्रपटाती निर्मिती केली. महत्वाचे म्हणजे या चित्रपटाचे शूटिंग चार वर्षे चालले. २०१२ साली या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आणि २०१६ साली शूटिंग संपले. हॉलीवूडच्या डार्क युनिव्हर्सचा हा पहिला चित्रपट होता.

२०१७ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.टॉम क्रूजने निक मॉर्टनची भूमिका साकारली होती. रसेल क्रो, सोफिया बुटेला, जेक जॉनसन, हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसतात. या चित्रपटाचे बजेट जवळजवळ १०४० कोटी इतके होते आणि या चित्रपटाने ३४०० कोटींची कमाई जगभरात केली होती. संपूर्ण जगभरात या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.