Top Trending Film On Netflix: नेटफ्लिक्सवर या आठवड्यात बरेच चित्रपट, सीरिज रिलीज झाल्या आहेत. सध्या एक बॉलीवूड चित्रपट नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करतोय. १५५ मिनिटांचा हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये नाही, तर थेट ओटीटीवर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटात एकही अॅक्शन सीन नाही, इतकंच काय तर यात कोणी खलनायकही नाही. एक साधीशी लव्ह स्टोरी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना फारच भावला आहे.
ओटीटीवरील ट्रेंडिंग चित्रपटांची यादी दर आठवड्यात बदलत असते. या आठवड्यात रिलीज झालेल्या एका चित्रपटाने टॉप १० ट्रेंडिंग सिनेमांच्या यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘आप जैसा कोई’.
‘आप जैसा कोई’ हा एक हिंदी रोमँटिक-ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट ११ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. यामध्ये आर. माधवन व फातिमा सना शेख या दोघांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तसेच आएशा रजा मिश्रा, नमित दास व मनीष चौधरी यांनीही या सिनेमात काम केलं आहे.
आप जैसा कोई सिनेमाची कथा
या चित्रपटाची कथा झारखंडमधील जमशेदपूरला राहणारा श्रीरेणू त्रिपाठी (आर. माधवन) व कोलकात्यात राहणाऱ्या मधु बोस (फातिमा सना शेख) यांच्याभोवती फिरते. श्रीरेणू संस्कृतचा शिक्षक आहे. तो ४० वर्षांचा झालाय, पण त्याचं लग्न झालेलं नाही. तो लग्नासाठी मुली बघत असतो, पण त्याचं लग्न जमत नसतं. याच दरम्यान त्याची भेट मधूशी होते. ती फ्रेंच भाषेची शिक्षिका असते. ती आधुनिक विचारांची असते. श्रीरेणू व मधू भेटू लागतात, एकमेकांना ते आवडू लागतात.
श्रीरेणू व मधू यांचा नातं साखरपुड्यापर्यंत पोहोचतं, पण त्याआधी असं काहीतरी घडतं की मधूकडे पाहण्याचा श्रीरेणूचा दृष्टीकोन बदलतो. यानंतर दोघांमध्ये दुरावा येतो.
‘आप जैसा कोई’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप भावला आहे. कारण या चित्रपटाने ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला असून तो सध्या ट्रेंडिंग आहे. ‘आप जैसा कोई’ रिलीज होताच टॉप ट्रेंडिंग लिस्टमध्ये सामील झाला आहे. आर. माधवन व फातिमा सना शेख यांचा हा चित्रपट देशातील टॉप १० सिनेमांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करतोय.
१५५ मिनिटांचा हा चित्रपट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. या सिनेमाचं दिग्दर्शन विवेक सोनीने केलं आहे. हा चित्रपट तुम्ही अद्याप पाहिला नसेल तर तो नेटफ्लिक्सवर घरबसल्या तुम्ही पाहू शकता.