scorecardresearch

उर्मिला मातोंडकरने ५ वर्षात नाकारले ५० हून अधिक चित्रपट, कारण…

‘तिवारी’ या वेबसीरिजचे दिग्दर्शन सौरभ वर्मा करणार आहे.

उर्मिला मातोंडकरने ५ वर्षात नाकारले ५० हून अधिक चित्रपट, कारण…
या सीरिजचे पोस्टर तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

नव्वदीच्या दशकातील टॉपची अभिनेत्री उर्मिला मातोंडकर तिच्या आगामी वेबसीरिजसाठी खूप उत्सुक आहे. गेल्या काही वर्षांपासून ती सिनेक्षेत्रापासून लांब होती. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आजोबा’ या मराठी चित्रपटामध्ये ती दिसली होती. बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर ती छोट्या पडद्यावरच्या ‘डीआयडी सुपरमॉम्स’ या रिअ‍ॅलिटी शो झळकली. कार्यक्रमामध्ये उर्मिलाने परिक्षक म्हणून काम केले.

‘तिवारी’ या वेबसीरिजच्या माध्यमातून उर्मिला मातोंडकर ओटीटी विश्वामध्ये पदार्पण करणार आहे. या सीरिजचे पोस्टर तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरवरुन ही एक अ‍ॅक्शनपॅक सीरिज असल्याचे लक्षात येत आहे. आई-मुलीच्या नात्यावर आधारित या सीरिजचे दिग्दर्शन सौरभ वर्मा करणार आहे. उर्मिला यांच्यासह काम करण्याचा अनुभव शेअर करताना तो म्हणाला की, “उर्मिला यांना गेल्या काही वर्षांमध्ये अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. पण त्यांना घाई करायची नव्हती. त्या आता ओटीटी विश्वामध्ये पदार्पण करणार आहेत. या सीरिजमधील काही सीन्स आम्ही भोपालमधील प्रत्यक्ष ठिकाणांवर जाऊन चित्रीकरण करणार आहोत. त्यांनी या क्षेत्रामध्ये खूप नाव कमावले आहे. त्यांच्यासह काम करताना त्या प्रतिमेला धक्का न पोहोचवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे”

आणखी वाचा — Video : ऋषभ पंतच्या वाढदिवशी उर्वशीने शेअर केला व्हिडीओ, ‘फ्लाइंग किस’ देत म्हणाली…

तो पुढे म्हणाला, “उर्मिला मातोंडकर यांना गेल्या ५-७ वर्षात ५० पेक्षा जास्त चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. पण त्यांनी सर्वांना नकार दिला होता. जेव्हा या वेबसीरिजमध्ये काम करण्यासाठी त्यांनी होकार दिला, तेव्हा आम्हांला खूप आनंद झाला. त्यांच्या या निर्णयामुळे आमचा आत्मविश्वास वाढला. या सीरिजमधील त्यांची भूमिका त्यांच्या ‘सत्या’, ‘कौन’ किंवा ‘एक हसीना थी’ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांना काही प्रमाणात समांतर वाटावी अशी आहे. या धाटणीच्या भूमिका करण्याचा त्यांचा अनुभव दांडगा आहे”

आणखी वाचा — कतरिनाला पाहून प्रेक्षकांची उडणार घाबरगुंडी; या चित्रपटात दिसणार भूताच्या भूमिकेत

पोस्टर शेअर करताना उर्मिला मातोंडकर यांनी या वेबसीरिजबद्दलची मनातील उत्सुकता व्यक्त केली आहे. या निमित्ताने त्या मनोरंजन विश्वामध्ये जबरदस्त कमबॅक करणार आहेत. तिने ‘रंगीला’, ‘सत्या’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या