बॉलीवूडमधील आघाडीचे दिग्दर्शक व निर्माते आशुतोष गोवारीकर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार असल्याचं समोर आलं आहे. ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘पानीपत’, ‘स्वदेश’ यांसारखे दमदार चित्रपट तयार करणारे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते आशुतोष गोवारीकर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. पण, एक उत्कृष्ट दिग्दर्शक किंवा निर्माते म्हणून नाही, तर एक अभिनेते म्हणून ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.

‘काला पानी’ या वेब सीरिजमधून आशुतोष गोवारीकरांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे. नेटफ्लिक्सनं पोशम पा पिक्चर्स व समीर सक्सेना यांच्या या नव्या सीरिजची नुकतीच घोषणा केली आहे. ‘काला पानी’च्या दिग्दर्शनाची धुरा समीर सक्सेना आणि अमित गोलानी यांनी सांभाळली आहे; तर बिस्वपती सरकार, निमिषा मिश्रा, संदीप साकेत आणि अमित गोलानी यांनी या सीरिजचं लिखाण केलं आहे.

हेही वाचा – आता आलिया करणार ॲक्शन सीन; शाहरुख-सलमानच्या स्पाय युनिवर्सीमध्ये अभिनेत्रीची एंट्री

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वात मराठमोळ्या व्हिडीओ क्रिएटरची दमदार एंट्री

ही वेब सीरिज एका अशा समाजावर आधारित आहे, जो समाज नैसर्गिक संकटातून वाचण्यासाठी प्रयत्न करत असतो. मानव आणि नैसर्गिक संकट यांच्यामधली अदृश्य लढाई या सीरिजमधून पाहायला मिळणार आहे. ‘काला पानी’ या सीरिजमध्ये आशुतोष गोवारीकर यांच्याव्यतिरिक्त मोना सिंह, अमेय वाघ, सुकांत गोयल, अरुशी शर्मा, राधिका मेहरोत्रा आणि विकास कुमार आहे.

हेही वाचा – फोटोग्राफरची रस्त्यावर पडलेली चप्पल उचलली अन्… आलियाच्या ‘त्या’ कृतीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आशुतोष गोवारीकर यांनी आपल्या करिअरची सुरुवात अभिनयापासूनच केली होती. १९८४ साली केतन मेहता दिग्दर्शित ‘होली’ या चित्रपटात त्यांनी अभिनेता म्हणून पहिलं काम केलं होतं. याच चित्रपटाच्या सेटवर गोवारीकर यांची भेट आमिर खानशी झाली. त्यानंतर त्यांनी टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केलं. तसेच २०१६ साली प्रदर्शित झालेल्या प्रियांका चोप्रा निर्मित ‘व्हेंटीलेटर’ चित्रपटातही त्यांनी राजा कामेरकर हे पात्र साकारलं होतं.