प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सातत्याने विविध विषयांवरील वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वात गाजलेली वेबसीरिज म्हणजे रानबाजार, आता प्लॅनेट मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक नवी वेब सीरिज ज्याचं नाव आहे अथांग. नुकताच या वेब सीरिजचा लॉन्चिंग सोहळा पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थिती दर्शविली होती.

अथांगचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले आहेत. या वाड्यात नक्की काय गूढ दडले आहे, ही अळवत कोण आणि तिचा सरदेशमुखांच्या वाड्याशी काय संबंध? त्या कड्यामागील रहस्य ? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. ट्रेलरवरून तरी या वेब सीरिजचा काळ ऐतिहासिक वाटत आहे. मात्र या सगळ्याची उत्तर शोधण्यासाठी ही वेबसीरिज पाहावी लागेल. नुकतीच प्लॅनेटवर वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे.

‘अथांग’मध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर आपल्याला दिसणार आहेत. मराठीतील दिग्गज कलाकार मंडळी यात आहेत त्यामुळे साहजिकच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता; केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”ओटीटीवर प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी पिरिऑडिक ड्रामा आहे. ज्यात रहस्य दडले आहे. हा एक वेगळा विषय आहे. ‘अथांग’च्या निमित्ताने तेजस्विनी पंडित पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. तर वेब सीरिजच्या दिग्दर्शकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते असं म्हणाले, ‘अथांग’ म्हणजे ज्याचा थांग लागत नाही असे. या वेबसीरिजचीही हीच खासियत आहे. शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही कथा आहे. ‘अथांग’चा प्रत्येक भाग क्षणोक्षणी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आहे. १९३० आणि १९६०च्या कालखंडात घडणारी ही कथा असून ‘अथांग’ बघताना आपणही तो काळ जगतोय, अशी जाणीव होईल. हळूहळू यातील एकेक गूढ उलगडत जाईल.”

प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन निर्मित, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत ‘अथांग’चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत. तेजस्विनी यावेळी वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती आता ती निर्मिती क्षेत्रात उतरली आहे.