Por Thozhil on SonyLIV : सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट पाहणं म्हणजे पर्वणी असते. अलिकडच्या काळात दाक्षिणात्य इंडस्ट्रीत या जॉनरच्या चित्रपटांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जात आहे. आज आपण एका दमदार दाक्षिणात्य चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. या चित्रपटाने थरारक पटकथेमुळे प्रेक्षकांची मनं जिंकली होती. हा चित्रपट जून २०२३ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि नंतर ओटीटीवर आला. या चित्रपटाचं नाव आहे ‘Por Thozhil’.

रिलीजपासूनच चर्चेत राहिलेल्या या चित्रपटाचं समीक्षकांनीही खूप कौतुक केलं होतं. IMDb वर या चित्रपटाला १० पैकी ८ रेटिंग मिळाले होते. खुनाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर बेतलेला हा चित्रपट आहे. २ तास २७ मिनिटांच्या या चित्रपटाची कथा ‘महाराजा’ पेक्षाही दमदार आहे.

चित्रपटाची कथा

या चित्रपटाची कथा दोन पोलीस अधिकाऱ्यांभोवती फिरते. एक सिनियर इन्स्पेक्टर असतो व दुसरा ज्युनियर असतो. दोघेही एका सिरियल किलर प्रकरणात एकत्र काम करत असतात. प्रवीण खूप घाबरट व पुस्तकवेडा अधिकारी असतो, तर लैलन मात्र अनुभवी व कडक असतो. दोघांचे विचार व काम करण्याची पद्धत खूप वेगळी असते. पण जेव्हा मर्डर मिस्ट्री सोडवण्याचा विषय येतो तेव्हा त्यांना एकत्र काम करावं लागतं. जसजशी कथा पुढे सरकते, तसतसे ट्विस्ट येतात, जे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतील. क्लायमॅक्स तर असा असतो ज्याची कुणी कल्पनाही केलेली नसते.

चित्रपटातील कलाकार

या चित्रपटात आर. सरथकुमार आणि अशोक सेल्वन यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. सिनेमात निखिला विमल, निझलगल रवी आणि इतर कलाकारांनीही त्यांच्या भूमिकांनी कथा अधिक दमदार बनवली. हा चित्रपट वेल्स जगरनाथनने दिग्दर्शित केला आहे. हा त्याचा पहिलाच चित्रपट होता. पण कथेवर आणि सस्पेन्सवरील त्याची पकड पाहून हा त्याचा पदार्पणाचा चित्रपट असल्यासारखं वाटत नाही.

Por Thozhil चित्रपट का पाहावा?

तो मानसशास्त्र आणि खुनीच्या मानसिकतेवरही प्रकाश टाकतो. सिनेमाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची उत्कृष्ट पटकथा आणि मजबूत पात्रे आहेत. हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो आणि जसजसा पुढे सरकतो, तसतसा रोमांचक होत जातो. यामुळेच अलिकडच्या काळातील सर्वोत्तम दक्षिणात्य थ्रिलर चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

Por Thozhil कुठे पाहावा?

‘Por Thozhil’ हा चित्रपट ओटीटीवर उपलब्ध आहे. तो तुम्ही तमिळ भाषेसह हिंदीतही पाहू शकता. Por Thozhil SonyLIV वर आहे. क्राइम थ्रिलर सिनेमांची आवड असेल, त्यांनी हा सिनेमा चुकवू नये. खासकरून याचा क्लायमॅक्स फारच अनपेक्षित आहे.