South Thriller Film On OTT: ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे फक्त देशातीलच नव्हे तर जगभरातील कलाकृती घरबसल्या पाहणं शक्य झालं आहे. तुम्ही तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवर ओटीटीवरील तुमचा आवडता सिनेमा, मालिका, शो पाहू शकता. एखादा चित्रपट पाहायचं म्हटलं की चित्रपटाला केवळ त्यातील कलाकारच नव्हे तर त्याची कथा, गाणी, पटकथा, अ‍ॅक्शन आणि इतर अनेक गोष्टी उत्तम बनवतात. आज आम्ही तुम्हाला एका दाक्षिणात्य थ्रिलरबद्दल सांगणार आहोत.

हा सुपरहिट चित्रपट तुम्ही शेवटपर्यंत पाहाल, इतकी दमदार याची कथा आहे. हा चित्रपट कोणता, तो कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे आणि त्याला आयएमडीबीवर किती रेटिंग मिळालंय, ते जाणून घेऊयात.

काय आहे या चित्रपटाचं नाव?

आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलतोय, त्यात साऊथ सुपरस्टार मोहनलाल, प्रकाश वर्मा, थॉमस असे अनेक कलाकार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘थुडारम’ आहे. २ तास ४६ मिनिटांच्या या चित्रपटात इतका सस्पेन्स आहे की तो पूर्ण संपवल्याशिवाय तुम्ही जागेवरून हलणार नाही. ‘थुडारम’ चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. या थ्रिलर चित्रपटाची कथा तुम्हाला भावनिक करेल.

‘थुडारम’ची कथा नेमकी काय आहे?

‘थुडारम’च्या कथेबद्दल बोलायचं झाल्यास, याची कथा एक ड्रायव्हर आणि त्याच्या कारवरील प्रेमापासून सुरू होते. मोहनलाल या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. त्याला त्याची कार खूप आवडते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यात वेगळं काय आहे. तर यात ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा त्याची सर्वात आवडती कार चोरीला जाते. यानंतर त्याच्या आयुष्यात सगळी उलथापालथ होते. कथा जसजशी पुढे सरकते तसतसे त्याच्या भूतकाळातील गोष्टींचे संदर्भ उलगडत जातात. या चित्रपटातील सस्पेन्स, दृश्ये आणि बॅकग्राउंड म्युझिक खूप दमदार आहे. त्यातले ट्विस्ट ज्या पद्धतीने समोर येतात, ते पाहताना तुमची नजर स्क्रीनवरून हटणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल थुडारम?

‘थुडारम’ तुम्ही घरबसल्या आरामात पाहू शकता. हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर उपलब्ध आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.६ रेटिंग मिळालंय. तुम्ही ओटीटीवर चांगला थ्रिलर सिनेमा शोधत असाल तर ‘थुडारम’ हा नक्कीच चांगला पर्याय असू शकतो.