९० च्या दशकातील अभिनेत्रींनी त्यांच्या दमदार अभिनयातून ओटीटीवर एक वेगळीच छाप पाडली आहे. माधुरी दीक्षित, सुश्मिता सेन, रविना टंडन या अभिनेत्रींच्या ओटीटीवरील भूमिकेला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. या यादीमध्ये अभिनेत्री काजोलचाही समावेश झाला आहे. काजोलचा नुकताच ‘लस्ट स्टोरीज २’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची चांगलीच चर्चा सुरू आहे. आता काजोलची बहुचर्चित वेब सीरिज ‘द ट्रायल’ ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजच्या प्रमोशनसाठी सध्या काजोल व्यग्र आहे. पण, यादरम्यान तिनं अजय देवगणविरोधात खटला दाखल करण्याबाबतचा खुलासा केला आहे.

हेही वाचा – ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाची दमदार कमाई, चौथ्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत काजोलनं, पती अजय देवगणविरोधात खटला दाखल करू शकते, असा खुलासा केला आहे. तसेच तिनं यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. या मुलाखतीमध्ये तिला प्रश्न विचारण्यात आला होता, “तुला पहिल्यांदा कोणावर खटला चालवायला आवडेल?” त्यावर उत्तर देताना काजोल म्हणाली, “मला अजय देवगणविरोधात खटला दाखल करायला आवडेल. यामागचं कारण म्हणजे तो माझा पती आहे. याव्यतिरिक्त दुसरं काही कारण देण्याची मला गरज वाटत नाही. पण अजयविरोधात खटला दाखल केला तर मी केलेले सगळे तो आरोप स्वीकारेल.”

हेही वाचा – “पाऊस आणि भूकंप एकत्र?” महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीबद्दल सोनाली कुलकर्णीची पोस्ट व्हायरल

काजोल आगामी ‘द ट्रायल’ वेब सीरिजमध्ये पहिल्यांदाच वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘द गुड वाइफ’ या अमेरिकन सीरिजचं हिंदी रूपांतरीत ‘द ट्रायल’ सीरिज आहे. अजय देवगण, दीपक धर, मृणालिनी जैन व राजेश चड्ढा यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे.

हेही वाचा – ‘गोल माल’ फेम ज्येष्ठ अभिनेते हरीश मॅगन यांचे निधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१४ जुलैला काजोलची नवी वेब सीरिज ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’वर प्रदर्शित होणार आहे. नायोनिका सेनगुप्ता हिच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कहाणी आहे. नायोनिकाच्या भूमिकेत काजोल असणार आहे. कोर्टरूममधील ड्रामा ‘द ट्रायल’मध्ये पाहायला मिळणार आहे.