Crime Thriller Movies On Netflix : तुम्हाला सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट पाहायला आवडतात का? तर आज आम्ही तुम्हाला अशा काही सिनेमांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला खिळवून ठेवतील व शेवटच्या दृश्यापर्यंत विचार करायला भाग पाडतील. जर तुम्हाला हिंदी आणि दक्षिणात्य चित्रपट पाहून कंटाळा आला असेल, तर हॉलीवूड सिनेमे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतात. हे सर्व थ्रिलर चित्रपट हिंदीमध्ये डब केलेले आहेत. नेटफ्लिक्सवर असे अनेक उत्तम आंतरराष्ट्रीय क्राइम थ्रिलर चित्रपट आहेत, जे तुम्ही हिंदीमध्ये पाहू शकता. सध्या ओटीटीवर काय पाहावं, असा विचार तुम्ही करत असाल तर नेटफ्लिक्सच्या हिंदीत डब केलेल्या टॉप 7 क्राइम थ्रिलर चित्रपटांबद्दल जाणून घ्या.

एक्सट्रॅक्शन

जर तुम्हाला जबरदस्त अ‍ॅक्शन आणि भावनिक चित्रपट आवडत असतील तर ‘एक्सट्रॅक्शन’ (Extraction) सिनेमा नक्की पाहा. एका काळ्या बाजारातील भाडोत्री व्यक्तीला अपहरण झालेल्या मुलाला वाचवण्याचे मिशन मिळते. ही कथा ढाकामध्ये सुरू होते. पुढे यात अ‍ॅक्शन, ड्रामा आणि थ्रिलचा जबरदस्त मिलाफ पाहायला मिळतो. हा चित्रपट हिंदीत डब करण्यात आला आहे. हा चित्रपट तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. जवळपास २ तासांच्या या चित्रपटाला आयएमबीडीवर १० पैकी ६.८ रेटिंग मिळाले आहे.

द गिल्टी

जेक गिलेनहालचा ‘द गिल्टी’ हा चित्रपट या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जेक गिलेनहालने एका कॉल सेंटर ऑपरेटरच्या भूमिकेत दमदार अभिनय केला आहे. ही कथा ९११ कॉलने सुरू होते, ज्यामध्ये एका महिलेचा जीव धोक्यात असतो. सिनेमातील संपूर्ण थरार फक्त एका खोलीत सेट केला आहे, पण तणाव आणि सस्पेन्स इतका जबरदस्त आहे की तुमची नजर हटणार नाही. हा चित्रपट दीड तासांचा आहे. त्याला आयएमडीबीवर ६.३ रेटिंग मिळाले आहे.

माइंडहंटर

या यादीत ‘माइंडहंटर’ ही सीरिज आहे. १९७० च्या दशकात, दोन एफबीआय एजंट असामान्य प्रकरणं सोडवण्यासाठी त्याच्या तळाशी जातात आणि सिरीयल किलर्सची सायकोलॉजी समजून घेण्याचा प्रयत्न करतात. हा चित्रपट हिंदीमध्ये डब केलेला उपलब्ध आहे.

द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू

‘द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू’ या सिनेमात एक शोध पत्रकार आणि एक हॅकर एका खूप जुन्या खुनाचे गूढ उलगडण्यासाठी एकत्र येतात. ही कथा जितकी गुंतागुंतीची आहे तितकीच ती रोमांचक आहे. चित्रपटातील प्रत्येक दृश्य तुम्हाला आश्चर्याचा धक्का देते. चित्रपट हिंदीमध्ये उत्तमरित्या डब केला आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.८ रेटिंग मिळाले आहे.

नाईटक्रॉलर

‘नाईटक्रॉलर’ ही एका अशा माणसाची कथा आहे जो रात्रीच्या वेळी गुन्हेगारी दृश्यांचे शूटिंग करतो आणि ती वृत्तवाहिन्यांना विकतो. पण हळूहळू तो स्वतः गुन्ह्यांमध्ये सामील होऊ लागतो, जेणेकरून त्याला खळबळजनक फुटेज मिळू शकेल. हा चित्रपट नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. हा चित्रपटही हिंदीत उपलब्ध आहे. ‘नाईटक्रॉलर’चे दिग्दर्शन डॅन गिलरॉय यांनी केले आहे. १ तास ५७ मिनिटांच्या या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.८ रेटिंग मिळाले आहे.

मर्डर मिस्ट्री

अॅडम सँडलर, जेनिफर अॅनिस्टन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘मर्डर मिस्ट्री’ हा थ्रिलर सिनेमाच्या चाहत्यांसाठी उत्तम पर्याय आहे. कॉमेडी व मिस्ट्रीचा मिलाफ असलेला हा चित्रपट तुमचे शेवटपर्यंत मनोरंजन करतो. या सिनेमात कथा एका जोडप्याची आहे. ते युरोपला फिरायला जातात आणि एका हाय-प्रोफाइल हत्या प्रकरणात अडकतात. या दीड तासाच्या ‘मर्डर मिस्ट्री’ला ६.१ रेटिंग मिळाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

द हायवेमन

जॉन ली हॅनकॉक दिग्दर्शित ‘द हायवेमन’ हा २ तास १२ मिनिटांचा चित्रपट आहे. हा चित्रपट अमेरिकेतील प्रसिद्ध गुन्हेगार जोडपं ‘बोनी व क्लाइड’ यांना पकडण्याच्या सत्य घटनेवर आधारित आहे. या सिनेमाची कथा संथ आहे पण मनोरंजक आहे. या सिनेमाला आयएमडीबीवर ६.८ रेटिंग मिळाले आहे.