सध्या सगळेच प्रेक्षक ओटीटीकडे वळले आहेत. खासकरून ओटीटीच्या बाबतीत भारतीय प्रेक्षकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. करोना महामारीमुळे ही वाढ झाली आहे. पण त्याआधी प्रेक्षकांना ‘वेबसीरिज’ची ओळख करून देणारा एकमेव शो तो म्हणजे ‘गेम ऑफ थ्रोन्स’. या वेबसीरिजची भारतात खासकरून जास्त चर्चा झाली. भारतीया प्रेक्षकांनी वेगवेगळ्या कारणांसाठी या सीरिजची पारायाणं केली आहेत. यामधली पात्रं तर लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. मात्र या वेबसीरिजच्या चाहत्यांसाठी वाईट आहे.

‘गेम ऑफ थ्रोन्स ही वेबसीरिज सध्या डिस्ने हॉटस्टार या ओटीटी माध्यमावर पाहायला मिळत आहे. मात्र आता ३१ तारखेपासून तुम्हाला ही वेबसीरिज पाहता येणार नाही कारण एचबीओ चॅनलबरोबर डिस्ने हॉटस्टारने केलेला करार आता संपणार आहे. या करारामध्ये डिस्ने हॉटस्टार एचबीओवर व्यवहार करताना कमी पडल्याने एचबीओ चॅनलवरील कार्यक्रम आता डिस्ने हॉटस्टारवर पाहता येणार नाहीत.

सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या ‘पॉर्न’ साईटच्या प्रवासावर बेतलेली डॉक्युमेंट्री ओटीटीवर; वाचा कधी, कुठे होणार रिलीज?

डिस्ने हॉटस्टारने याबाबत आपल्या ट्वीटवर अकाउंटवर माहिती दिली आहे. तसेच एचबीओ मॅक्स हे लवकरच भारतात दाखल होईल सध्या या चॅनेलवरील कंटेंट भारतीयांना पाहता येत नाही. डिसेंबर २०२२ मध्ये अमेझॉन व एचबीओ चॅनेलबरोबर करार करण्यात आला. ज्यामध्ये प्रेक्षकांनी एचबीओला सबस्क्राइब करून त्यांना अमेझॉन व्हिडीओ अँपच्या मार्फत तिथला कंटेंट पाहता येईल मात्र ही सेवा सध्या अमेरिकेपुरती मर्यादित आहे. भारतातील प्रेक्षकांसाठी लवकरच सेवा सुरु करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एचबीओवरील कंटेंट या महिन्याच्या अखेरपर्यंत डिस्ने हॉटस्टारवर पाहता येणार आहे. त्यामुळे एचबीओवरील कोणताही कार्यक्रम पाहायचा राहून गेला असल्यास या महिन्यापर्यंत तुम्ही पाहू शकता. तसेच यंदा आयपीएलदेखील डिस्ने हॉटस्टारवर पाहता येणार नाही. जिओ सिनेमावर सामन्यांचे प्रक्षेपण पाहता येणार आहे.