आजकल चित्रपटाच्या प्रदर्शनाप्रमाणेच त्याच्या ओटीटी रिलीजसाठीदेखील आपल्याला उत्सुकता पाहायला मिळते. एखादा चित्रपट कोणत्या ओटीटीवर येणार, त्याचे हक्क कितीला विकले गेले अशा बऱ्याच गोष्टींची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. चित्रपटरसिक खूप दिवसांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही चित्रपटांची वाट पाहत आहेत. त्यापैकी हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा ‘विक्रम वेधा’ आणि वरुण व धवन क्रीती सनॉनचा ‘भेडिया’ हे दोन्ही चित्रपट चर्चेत होते.

‘विक्रम वेधा’ आणि ‘भेडिया’ हे दोन्ही चित्रपट अद्याप कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेले नाहीत कारण हे दोन्ही चित्रपट लवकरच लाँच होणार्‍या जियोच्या नवीन सुपर अॅपवर प्रदर्शित केले जाणार असल्याचं म्हंटलं जात होतं, पण आता प्रतीक्षा संपली आहे. या दोन्ही चित्रपटांच्या ओटीटी रिलीजबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Wardha Lok Sabha, pm modi,
“आता बस झाले, यापुढे सभा मिळणार नाही,” कोणी दिला इशारा? जाणून घ्या सविस्तर…
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

मीडिया रीपोर्टनुसार येत्या २१ एप्रिलला ‘भेडिया’ हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याबद्दल चित्रपटांचे निर्माते किंवा कलाकार यांनी कोणतीच अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. तर हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट ८ मे रोजी याच जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आणखी वाचा : YRF च्या सर्वात महागड्या अशा ‘Tiger Vs Pathaan’ चं बजेट ठाऊक आहे का? सलमान-शाहरुख घेणार ‘एवढी’ रक्कम

हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होऊन ६ महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे तरी हे अजून ओटीटीवर प्रदर्शित न झाल्याने बरेच प्रेक्षक खोळंबले होते. या दोन्ही चित्रपटांना समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनी पसंत केलं. बॉक्स ऑफिसवर जरी यांनी फारशी कमाई केली नसली तरी लोकांना हे चित्रपट आवडले. यापैकी ‘विक्रम वेधा’ हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे.