बॉलीवूड अभिनेत्री अमीषा पटेल सध्या तिच्या ‘गदर २’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तब्बल २२ वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘गदर २’च्या निमित्ताने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अमीषाने ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत भाष्य केले. ओटीटी प्लॅटफॉर्मवर समलैंगिकता, वादग्रस्त आणि कुटुंबाबरोबर एकत्र बसून पाहता येणार नाही अशा सीरिज दाखवल्या जातात असे वक्तव्य अभिनेत्रीकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : ‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतशीर यांनी जनतेची मागितली जाहीर माफी; म्हणाले, “मी हात जोडून…”

‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत अमीषाने ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल भाष्य केले. अभिनेत्री म्हणाली, “अलीकडे प्रेक्षक चांगल्या आणि निखळ मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. एक काळ असा होता जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासह आजी-आजोबांच्या उपस्थित एकत्रित चित्रपट पाहत होतात. मात्र, तो काळ आता नाहीसा होऊन तसे चित्रपटही आता बनवले जात नाहीत. ओटीटी माध्यमांवर समलैंगिकता, गे-लेस्बियन अशा प्रकारच्या सीरिजवर जास्त भर देण्यात येतो.”

हेही वाचा : “बाळासाहेबांचं ते स्वप्न अपूर्णच”, नितीन गडकरींचा खुलासा; म्हणाले, “त्यांच्या निधनाआधी मी रुग्णालयात भेटल्यावर…”

अमीषा पुढे म्हणाली, “ओटीटी सीरिजमधील बहुतांश सीन्स तुम्ही तुमच्या लहान मुलांसमवेत पाहू शकत नाही. मुलं कोणताही ओटीटी ॲप ओपन करून पाहू नयेत म्हणून पालक टीव्हीला चाईल्ड लॉक लावून ठेवतात. यावरून असे कळते की, ओटीटीवर अशा सीरिज किंवा चित्रपट आहेत जे तुम्ही कुटुंबाबरोबर पाहू शकत नाही. बॉलीवूड यापेक्षा पूर्णपणे वेगळे असून ते चित्रपट तुम्ही आरामात तुमच्या कुटुंबीयांबरोबर बसून पाहू शकता.”

हेही वाचा : 72 Hoorain: पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला चित्रपट, कमावले फक्त ‘इतके’ लाख रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘गदर २’ बद्दल सांगताना अमीषा म्हणाली, पहिल्या चित्रपटाचा आशय निर्मात्यांनी दुसऱ्या भागात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, कारण ‘गदर’ हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. यामध्ये प्रेक्षकांना सुंदर संगीत, संवाद, इमोशन्स, ॲक्शन असे सर्वकाही पाहायला मिळेल. दरम्यान अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ चित्रपट ११ ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.