अभिनेता झीशान अय्युब त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखला जातो. यावर्षी आलेल्या स्कूप सीरिजमध्ये त्याने इमरान नावाच्या एका संपादकाची भूमिका साकारली होती, जी खूप लोकप्रिय झाली आणि झीशानच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. त्यानंतर नुकताच तो नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘हड्डी’ चित्रपटात दिसला. ‘हड्डी’मध्ये त्याने नवाजुद्दीनने साकारलेल्या पात्राच्या प्रियकराची भूमिका केली आहे.

“त्यांना वाटत असेल की मी…”, ‘वेलकम टू द जंगल’चा भाग नसण्याबद्दल स्पष्टच बोलले नाना पाटेकर

झीशान अय्युबने ओटीटीवरील कंटेंटबद्दल त्याचं मत मांडलं आहे. “आता ओटीटी प्लॅटफॉर्म्स अत्यंत फालतू गोष्टींनाही चांगल्या म्हणत आहे. ओटीटी फक्त चांगल्या कंटेंटबद्दल आहे असं आपण म्हणतो पण मला वाटतं की आता ओटीटी भ्रष्ट झाले आहे. ओटीटीवर कशाचंही सेलिब्रेशन केलं जातं. ओटीटीवर कोणत्याही वाईट गोष्टींचे चांगले म्हणून वर्णन केले जात आहे. ओटीटीवरील अनेक अभिनेत्यांना त्यांनी चांगलं काम केलं नसूनही सन्मानित केलं जात आहे,” असं झीशान अय्युब म्हणाला.

अनुराग कश्यप सलमान-शाहरुख खानबरोबर का काम करत नाही? खुलासा करत म्हणाला, “त्यांचे चित्रपट फ्लॉप…”

पुढे तो ‘हड्डी’ चित्रपटातील त्याच्या पात्राबाबत बोलताना म्हणाला, “त्याची भूमिका मोठी आहे की लहान याने त्याला काही फरक पडत नाही. त्याला आनंद घेत त्याचं काम करायचं आहे. हड्डीमध्ये अनुराग कश्यपबरोबर माझे फारसे सीन नाहीत, पण असं असूनही मला या चित्रपटातील व्यक्तिरेखा साकारताना खूप मजा आली.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, झीशानने आतापर्यंत ‘तनु वेड्स मनू’, ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘तांडव’, ‘रांझना’, ‘झिरो’, ‘आर्टिकल १५’ अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनयाशिवाय तो आपल्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखला जातो.