OTT Release This Week: मे महिना जवळजवळ अर्धा संपला आहे. या महिन्यात ओटीटीवर अनेक उत्तम चित्रपट आणि सीरिज रिलीज झाल्या आहेत. आता १२ मे ते १८ मे पर्यंत प्रेक्षकांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर बऱ्याच नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. या आठवड्यात, जॅकलिन फर्नांडिसच्या ‘है जुनून’ ते ‘डस्टर’ या चित्रपटांसह अनेक चित्रपट आणि मालिका ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत.
या वीकेंडला घरी बसून तुम्हाला कोणत्या नवीन कलाकृती ओटीटीवर पाहता येतील, ते जाणून घेऊयात.
है जुनून
Hai Junoon on OTT: जॅकलिन फर्नांडिस व नील नितीन मुकेश यांचा म्युझिकल ड्रामा सीरिजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सीरिजची कथा एका महाविद्यालयाभोवती फिरते जिथे दोन विद्यार्थ्यांचे क्लब आहेत. या क्लबचे नेतृत्व पर्ल आणि गगन करत असतात. या दोघांमध्ये स्पर्धा असते. अशा परिस्थितीत कोण जिंकते आणि कोण हरते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ही सीरिज १६ मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर येणार आहे.
डस्टर
Duster on OTT : ‘डस्टर’ ही एक वेब सीरिज आहे. या सीरिजमध्ये ७० च्या दशकातील क्राइम ड्रामा पाहायला मिळेल. प्रेक्षकांना एफबीआयची पहिली कृष्णवर्णीय महिला एजंट (रेचेल हिल्सन) आणि एक प्रतिभावान गेटअवे ड्रायव्हर (जोश हॉलोवे) यांची कथा पाहायला मिळेल. ही मालिका १६ मे रोजी जिओ हॉटस्टारवर देखील रिलीज होणार आहे.
मरनामास
Maranamass on OTT: ‘मरनामस’ हा एक मल्याळम चित्रपट आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना भरपूर कॉमेडी व थरार पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात बेसिल जोसेफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे, जो ओएलएक्सवर एका स्थानिक पोलीस स्टेशनची माहिती टाकतो. यानंतर यात अनेक ट्विस्ट आणि टर्न्सही पाहायला मिळतील. हा चित्रपट १४ मे रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित झाला आहे.
बॅड थॉट्स
Bad Thoughts on OTT : ‘बॅड थॉट्स’ ही एक इंग्रजी सीरिज आहे. या विनोदी सीरिजमध्ये रॉबर्ट इलर, डॅनिएला पिनेडा व क्रिस्टीना पाजिट्जकीसह अनेक कलाकार आहेत. ‘बॅड थॉट्स’ १३ मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे.
राजकुमार राव व वामिका गब्बी स्टारर ‘भूल चुक माफ’ हा चित्रपट आधी ओटीटीवर प्रदर्शित होणार होता, परंतु आता तो चित्रपटगृहांमध्ये पाहता येणार आहे आणि त्याची नवीन रिलीज तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.