सध्या हिंदीप्रमाणेच मराठी चित्रपटांनाही सुगीचे दिवस आले आहेत. रितेश देशमुखचा ‘वेड’ अन् पाठोपाठ केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. याबरोबरीनेच ‘घर बंदुक बिर्याणी’ अन् ‘वाळवी’सारख्या चित्रपटांनीही सवयीप्रमाणे प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला. असाच एक आणखी आगळा वेगळा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता.
अभिनेते दिग्दर्शक हृषिकेश जोशी दिग्दर्शित ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट हा चित्रपट २९ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. इतकंच नव्हे तर चित्रपटसृष्टीतील कित्येक कलाकारांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं होतं.
आणखी वाचा : The Railway Men Teaser : भोपाळ गॅस दुर्घटनेवर बेतलेल्या वेबसीरिजचा काळजाचा थरकाप उडवणारा टीझर प्रदर्शित
पाहायला गेलं तर हा एक अत्यंत वेगळ्या धाटणीचा एक धमाल चित्रपट आहे, परंतु चित्रपटाच्या अशा अशा वेगळ्या आणि हटके नावाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फारशी कमाल दाखवली नसली तरी या चित्रपटाला ठीकठाक प्रतिसाद लोकांनी दिला. हा एक डार्क कॉमेडी चित्रपट होता. चित्रपटगृहात फार काळ टिकू न शकल्याने बऱ्याच लोकांचा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायचा राहून गेला.
अशा प्रेक्षकांसाठी आता खुशखबर आहे. ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा चित्रपट मोफत पाहू शकता. तुमच्याकडे प्राइम मेंबरशिप असेल तर यासाठी वेगळे पैसे तुम्हाला मोजावे लागणार नाहीयेत. या चित्रपटात प्राजक्ता माळी वैभव तत्तवादी, आलोक राजवाडे व खुद्द हृषिकेश जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.