‘बिग बॉस ओटीटी २’ मध्ये फेम जाद हदीद आणि आकांक्षा पुरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘बिग बॉस ओटीटी २’ मध्ये या दोघांच्या नावाची खूप चर्चा रंगली होती. नुकतचं दोघांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यानचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात दोघांनी असं काही कृत्य केलं की परत सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडेच वळल्या आहेत.
सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. एका कार्यक्रमात जाद हदीद, आकांक्षा पुरी यांच्यासह नवाजुद्दीन सिद्दीकी यांची पत्नी आलिया सिद्दीकी , पलक पुरस्वामी, आशिका भाटिया आणि अन्य बिग बॉस ओटीटी २ स्पर्धेकांनी हजेरी लावली होती. दरम्यान कॅमेऱ्यासमोर जाद हदीद आणि आकांक्षा पुरी यांनी पुन्हा एकदा एकमेकांना किस केलं आहे.
व्हिडीओमध्ये जादने पहिल्यांदा आकांक्षाच्या गालावर किस केलं. त्यानंतर लगेचच आकांक्षाने जादच्या गालावर किस केलं. दरम्यान या नव्या व्हिडीओवर नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. अनेकांनी जाद आणि आकांक्षाला ट्रोल केलं आहे. एका युजरने लिहिलं “ही बिग बॉसमध्ये किस करण्यासाठी गेली होती”. दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिलं “हे दोघे कधीच सुधारणार नाही.”
हेही वाचा- सुश्मिता सेनची वेबसीरिज पाहिल्यानंतर सायली संजीवची पोस्ट, म्हणाली “ताली तर…”
बिग बॉसच्या घरात राहत असताना दोघांच्या लिपलॉकच्या व्हिडीओने चर्चांना उधाण आलं होतं. स्पर्धक अविनाश सचदेव याने जैद आणि आकांक्षाला किस करण्याचे टास्क दिले होते. दोघांनी ते आव्हान स्वीकारलं आणि ते ३० सेकंद एकमेकांना किस करत होते.