एका रेल्वे प्रवासावर बेतलेला दमदार अॅक्शनपट वर्षभरापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. नवोदित कलाकारांना घेऊन दिग्दर्शकाने तयार केलेला हा जबरदस्त चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. चित्रपटाची कथा इतकी दमदार आहे की शेवटपर्यंत स्क्रीनवरून तुमची नजर हटणार नाही.

या चित्रपटाचे नाव ‘किल’ (Kill) आहे. हा चित्रपट अजिबात कंटाळवाणा नाही. तो तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. ज्यांना अॅक्शन सिनेमे पाहायला आवडतात, त्यांच्यासाठी तर ही पर्वणीच आहे. या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. मुख्य म्हणजे यात कोणताही सुपरस्टार नाही. जवळपास सर्वच तरुण कलाकार नवोदित आहेत. तरीही या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

निखिल नागेश भट्ट दिग्दर्शित ‘किल’ चित्रपट ओटीटीवर उपलब्ध आहे. हा सिनेमा तुम्ही प्राइम व्हिडीओ व जिओ हॉटस्टारवर पाहू शकता. तुम्हाला जर उत्तम कथा असलेला अॅक्शन चित्रपट पाहायचा असेल तर ‘किल’ तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

Kill ची कथा काय आहे?

या चित्रपटात भारतीय सैन्यातील जवान अमृत (अभिनेता लक्ष्य) आपल्या मित्राबरोबर रेल्वेने पाटण्याहून दिल्लीला जात असतो. या रेल्वेत त्याची प्रेयसीदेखील असते. याच दरम्यान लूटपाट करणारी एक टोळी रेल्वेत शिरते आणि अनेक प्रवाशांची हत्या करते.

दिग्दर्शकाने नवीन कलाकारांसह एक उत्तम अ‍ॅक्शन चित्रपट बनवला आणि तो हिट ठरला. कथा हळूहळू पुढे सरकते पण पुढे काय होईल याची उत्सुकता कमी होत नाही. हा चित्रपट नावाप्रमाणचे खून, रक्तपात आणि हिंसाचाराने भरलेला आहे. तरीही चित्रपटातील एकही दृश्य अनावश्यक किंवा कंटाळवाणे वाटत नाही, हेच या सिनेमाचे यश म्हणायला पाहिजे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत, दिग्दर्शक सतत अ‍ॅक्शन आणि रोमांचक पटकथेने आपल्याला अवाक् करतो.

राघव जुयाल नकारात्मक भूमिकेत

चित्रपटाची कथा खूप साधी सरळ आहे. यात लोकप्रिय डान्सर राघव जुयालने नकारात्मक भूमिका केली आहे. एका रेल्वे प्रवासावर बेतलेला हा पावणेदोन तासांचा चित्रपट थ्रिलने भरलेला आहे. धावत्या रेल्वेत चित्रपटाचं शूटिंग व्यवस्थित करण्यात आलं आहे, त्यामुळे त्यातली दृश्ये खटकत नाही. कोणताही सुपरस्टार नसताना हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता, यावरून त्याची कथा व कलाकारांचा अभिनय किती दमदार आहे, याची तुम्हाला कल्पना येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘किल’ हा चित्रपट १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी नाही. हा तुम्ही ओटीटीवर पाहू शकता. १ तास ४५ मिनिटांचा हा चित्रपट हिट ठरला होता. याला आयएमडीबीवर ७.५ रेटिंग मिळाले होते.