ओटीटीवर आता प्रादेशिक भाषांमधील कंटेंट दाखवण्याकडे निर्मात्यांचा कल वाढत आहे. अनेक मराठी चित्रपट व मालिकांचे हिंदी किंवा इतर भाषेत रिमेक होतात. आता प्रकाश नारायण संत यांच्या कादंबरीवर आधारित एक सीरिज प्रेक्षकांना ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. या सीरिजचं नाव ‘लंपन’ असं आहे.

‘लंपन’ ही मराठी सीरिज लवकरच सोनी लिव्हवर येणार आहे. या सीरिजमध्ये मराठी साहित्‍याची जादू अनुभवायला मिळणार आहे. प्रकाश नारायण संत यांची लोकप्रिय कादंबरी ‘वनवास’वर आधारित या सीरिजमध्ये मिहिर गोडबोलेने लंपन ही भूमिका साकारली आहे. ही सिरीज १६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. ही सीरीज तरूण मुलगा लंपनच्‍या आत्‍म-शोधाच्‍या प्रयत्‍नांची गोष्ट आहे. यात लंपनच्या ‘आजी’च्‍या भूमिकेत गीतांजली कुलकर्णी, त्‍याच्‍या आजोबाच्‍या भूमिकेत चंद्रकांत कुलकर्णी, त्‍याची जिवलग मैत्रीण सुमीच्‍या भूमिकेत अवनी भावे आणि त्याच्‍या वडिलांच्‍या भूमिकेत पुष्‍कराज चिरपुटकर व त्‍याच्‍या आईच्‍या भूमिकेत कादंबरी कदम दिसणार आहेत.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

आपल्‍या भूमिकेबाबत सांगताना गीतांजली म्‍हणाल्‍या, “मी प्रकाश नारायण संत यांच्‍या कथा ऐकत मोठे झाले आणि त्‍यांच्‍या कथांमधील जादुई विश्‍वाने नेहमी माझे लक्ष वेधून घेतले. आता, त्‍यांच्‍या लोकप्रिय कलाकृतीमधील एका पात्राची भूमिका साकारताना मला खूप आनंद होत आहे. लंपनच्‍या आजीची भूमिका साकारण्‍याचा अनुभव खूप चांगला होता. ती लंपनवर प्रेम करते व त्‍याला मार्गदर्शन करते, शिस्‍तबद्धतेचे धडे देते.”

प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचं लग्न थाटात पडलं पार, चार्टर्ड अकाउंटंट आहे जावई, पाहा सोहळ्याचे Photos

मराठी भाषेत या सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. गावाकडचं वातावरण, आजी-आजोबांकडे राहणाऱ्या लंपनला नवीन ठिकाणी रुळायला करावी लागणारी धडपड या सीरिजच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. आजी -आजोबांचं प्रेम, गावाकडचे खेळ असं सगळं या सीरिजमध्ये पाहता येईल.

सत्य घटनेवर आधारित ‘हे’ K-Drama ओटीटीवर आहेत उपलब्ध; घरबसल्या पाहता येणार रोमान्स, सस्पेन्स अन् थ्रिलरचा मिलाफ

एकेकाळी मालिकाविश्व गाजवणारी व बाळंतपणानंतर सिनेसृष्टीतून ब्रेक घेणारी ‘अवघाची संसार’ फेम अभिनेत्री कादंबरी कदम आता या सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करत आहे. निपुण धर्माधिकारी दि‍ग्‍दर्शित या सीरिजचे निर्माते श्रीरंग गोडबोले, ऋषिकेश देशपांडे, अमित पटवर्धन आहेत. तरूण मुलगा लंपन बालपणीच्या गोष्टी या सीरिजमध्ये पाहायला मिळतील. प्रकाश नारायण संतांच्या ४ पुस्तकांवर आधारित ही वेब सीरिज आहे. ही सीरिज १६ मेपासून फक्‍त सोनी लिव्‍हवर पाहता येणार आहे.