२०२५ मध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. यापैकी काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. या चित्रपटांना थिएटरमध्ये व ओटीटीवर चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या असाच एक थ्रिलर चित्रपट ओटीटीवर ट्रेंड करतोय. या चित्रपटाचं नाव ‘मारीसन’ असं आहे. दमदार क्लायमॅक्समुळे ‘मारीसन’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
मारीसनची कथा
‘मारीसन’ हा तमिळ भाषेतील एक उत्तम सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. यात फहाद फाझिल तसेच लोकप्रिय अभिनेता वडिवेलू आहेत. ही कथा एका चोराची आहे, जी फहाद फाझिलने उत्तम प्रकारे साकारली आहे. जेव्हा तो चोरी करण्यासाठी घरात जातो तेव्हा त्याच्या आयुष्यात एक नवीन वळण घेते. यानंतर, तो खून आणि कटाच्या वेगळ्याच प्रकरणात अडकतो.
चित्रपटाची सुरुवात तुरुंगात होते. तुरुंगातून एका गुन्हेगाराची सुटका होत असते आणि पोलिस त्याला पुन्हा असे गुन्हे करू नये अशी ताकीद देतात. पण त्याला चोरी करण्याची सवय असते. त्यामुळे तुरुंगातून बाहेर येताच तो सर्वात आधी फोन चोरतो आणि नंतर बाईक चोरतो. यानंतर खरी कहाणी सुरू होते.
तुम्ही ‘मारीसन’ पाहू लागलात की सुरुवातीला तुम्हाला हसायला येईल. काय चित्रपट आहे, असंही वाटेल, पण तासभरानंतर तुम्हाला लक्षात येईल की हा एक सामान्य चित्रपट नाही, तर हा एक अद्भुत थ्रिलर चित्रपट आहे. सुरुवातीपासून सुरू असलेला सस्पेन्स हा सिनेमा थ्रिलर वाटत नसला, तरी कथा अचानक एक नवीन वळण घेते. या चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर तुम्ही चक्रावून जाल. हा सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला ‘दृश्यम’च्या दोन्ही भागांची आठवण येईल.
ओटीटीवर कुठे पाहायचा चित्रपट?
Maareesan on Netflix: ‘मारीसन’ चित्रपट ओटीटीवर उपलब्ध आहे, तुम्ही तो नेटफ्लिक्सवर पाहू शकता. तो काही काळापासून टॉप १० चित्रपटांच्या यादीत आहे. नेटफ्लिक्सवरही या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. तुम्ही नेटफ्लिक्सवर दरमहा १९९ रुपयांचा पॅक घेऊन हा चित्रपट सहज पाहू शकता. या चित्रपटाला IMDb वर ७.५ रेटिंग मिळाले आहे. ‘मारीसन’चा रनटाइम २ तास ३० मिनिटं आहे.
चित्रपटातील कलाकार
या चित्रपटात ‘पुष्पा’ फेम फहाद फाझिल आहे. ‘पुष्पा’ प्रमाणेच या भूमिकेतील त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. या चित्रपटात वडिवेलूदेखील आहे. दोघांनी ‘मारीसन’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.