या वीकेंडला काय करताय? काहीच प्लॅन नाही? घरी कुटुंबाबरोबर वेळ घालवणार असाल तर तुम्ही ओटीटीवर आलेला एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट पाहू शकता. २ तास २ मिनिटांचा हा चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. कथा सुरू झाल्यानंतर १० मिनिटांनी तुम्हाला सिनेमात पुढे काय होईल असा प्रश्न पडेल. फक्त ५ कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. शेवटच्या २० मिनिटांत चित्रपटाची कथा इतकी गुंतते की ते पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल.

शाही कबीर दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव ‘रोंथ’ (Ronth on OTT) आहे. याची निर्मिती विनीत जैन, रतीश अंबट, रेजिंथ ईव्हीएम, जोजो जोस यांनी केली आहे. हा एक मल्याळम क्राइम थ्रिलर आहे. हा चित्रपट ओटीटीवर हिंदीमध्ये देखील उपलब्ध आहे. ‘रोंथ’चा अर्थ गस्त घालणे असा होतो. या चित्रपटाची कथा एका रात्री घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे.

‘रोंथ’ हा एक सस्पेन्स व इन्व्हेस्टिगेशन थ्रिलर चित्रपट आहे. ही कथा दोन पोलिसांची आहे. त्यापैकी एक कनिष्ठ आहे आणि दुसरा एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे. एकदा ते दोघेही शहरात गस्त घालण्यासाठी बाहेर पडतात, जसजशी रात्र होते तसतसं ते दोघेही एका विचित्र प्रसंगात अडकतात.

पाहा ट्रेलर

एके रात्री ते गस्तीवर असताना दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्याला दंड ठोठावतात. याचदरम्यान एक कुटुंब त्यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार देतं. यानंतर जे घडतं ते पाहून डोकं चक्रावतं. या सस्पेन्स चित्रपटात एकापाठापोठ घडणाऱ्या घटना व शेवटी येणारा ट्विस्ट चित्रपटाची ताकद आहेत. या चित्रपटात रात्रीची दृश्ये अत्यंत उत्तम पद्धतीने शूट करण्यात आली आहेत. अनिल जॉन्सनचे बॅकग्राउंड म्युझिक चित्रपटातील थ्रिलला साजेसे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही वीकेंडला ओटीटीवर काय पाहायचं असा विचार करत असाल तर ‘रोंथ’ तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. ‘रोंथ’ हा चित्रपट जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.४ रेटिंग मिळाले आहे. ‘रोंथ’ हा चित्रपट १३ जून रोजी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला होता. ५ कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने ९ कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते.