हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेला अभिनेता मनोज बाजपेयी हा विविध कारणांमुळे चर्चेत असतो. दर्जेदार अभिनयाने मनोजने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. ‘सत्या’मधला भिकु म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सरदार खान अशा वेगवेगळ्या भूमिका मनोजने अजरामर केल्या आहेत. केवळ चित्रपटच नव्हे तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मनोजने त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

प्राइम व्हिडिओच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजच्या माध्यमातून मनोज बाजपेयीने ओटीटी विश्वात पदार्पण केलं. लोकांनी ही सीरिज अक्षरशः डोक्यावर घेतली. मध्यंतरी या वेबसीरिजचा दूसरा सीझनसुद्धा प्रदर्शित झाला अन् त्यालाही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. या वेबसीरिजमधील त्याने साकारलेलं श्रीकांत तिवारी हे पात्र लोकांना खूप भावलं. आता या वेबसीरिजच्या पुढच्या सीझनची चर्चा सुरू आहे.

आणखी वाचा : ‘पॅन इंडिया स्टार’ अशी ओळख निर्माण झाल्याबद्दल विजय सेतुपतीने व्यक्त केली नाराजी; म्हणाला “मी फक्त…”

खुद्द मनोज बाजपेयीने एक व्हिडिओ शेअर करत लोकांना या वेबसीरिजच्या पुढच्या सीझनची हिंट दिली आहे. मनोजने याबद्दल उघडपणे काहीच सांगितलं नसलं तरी या व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी या सीरिजचा पुढचा सीझन येत असल्याचा अंदाज लावला आहे. व्हिडिओमध्ये मनोज बाजपेयी प्रेक्षकांची चौकशी करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधत तो म्हणाला, “बरेच दिवस झाले तुम्हाला भेटून, आता माझं म्हणणं नीट एका. या होळीच्या निमित्ताने मी येतोय तुमच्या फॅमिलीला भेटायला माझ्या फॅमिलीला घेऊन, भेटूया लवकरच.” हा व्हिडिओ पोस्ट केल्यावर लगेचच चाहत्यांनी मनोजच्या मनातली गोष्ट ओळखली आहे. ‘फॅमिली मॅन ३’ लवकरच येणार अशा कॉमेंटही लोकांनी व्हिडिओखाली केला आहे. प्रेक्षक या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पहात आहेत. याच्या दुसऱ्या सीझनमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू ही खलनायिकेच्या भूमिकेत दिसली होती. आता या नव्या सीझनमध्ये नेमकं काय कथानक असणार यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत.