झोया अख्तरचा ‘द आर्चीज’ चित्रपट ७ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. अगस्त्य नंदा, सुहाना खान, खुशी कपूर, वेदांग रैना, मिहीर आहुजा, अदिती सैगल आणि युवराज मेंदा ही या चित्रपटातील स्टारकास्ट आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एका भव्य प्रीमियरचे आयोजन केले होते. शाहरुख खान, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, कतरिना कैफ आणि रणवीर सिंह यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

चित्रपट पाहिल्यानंतर सेलिब्रिटींनी या चित्रपटाबद्दल आपल्या प्रतिक्रिया दिल्या. चित्रपटसृष्टीतील लोकांनी या चित्रपटाची प्रशंसा केली असली तरी सोशल मीडियावर एक मोठा वर्ग असा आहे ज्यांना हा चित्रपट अजिबात पसंत पडलेला नाही. एकूणच या चित्रपटाबद्दल फारशा सकारात्मक प्रतिक्रिया समोर येत नाहीयेत, शिवाय यात काम करणाऱ्या सगळ्याच स्टारकिड्सचा अभिनय कोणालाच फारसा पसंत पडलेला नाही. अशातच बॉलिवूड अभिनेते मनोज बाजपेयी यांनी नुकतीच या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : “टिळा लावलेला हिंदू…” बॉबी देओलचं पात्र मुस्लिम दाखवल्यामुळे होणाऱ्या टिकेला ‘अ‍ॅनिमल’च्या निर्मात्याचं चोख उत्तर

हा चित्रपट केवळ आपल्या मुलीसाठी पाहिल्याचं मनोज यांनी नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलं आहे. ‘झुम’शी संवाद साधताना मनोज बाजपेयी म्हणाले, “माझी मुलगी अवा ‘द आर्चीज’ बघत होती, मी तिच्याबरोबर तो चित्रपट पहात होतो, ५० मिनिटांनी मी तिला सांगितलं की मला काही हे आवडत नाहीये. ‘आर्चीज’ हा कधीच माझ्या बालपणाचा हिस्सा नव्हतं. माझं बालपण मोटू-पतलू, राम-बलराम पाहण्यात गेलं. मी कदाचित ‘आर्चीज’चं एखादं कॉमिक वाचलं असेल त्यामुळे मला वेरॉनिका आणि बेट्टी ही पात्र ठाऊक आहेत, पण माझ्या मुलीलादेखील तो चित्रपट आवडत नव्हता.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतकंच नव्हे तर मनोज बाजपेयी यांना ‘द आर्चीज’ पाहायची अजिबात इच्छा नव्हती पण केवळ मुलीसाठी त्यांनी वेळात वेळ काढून तिच्याबरोबर काही कॉमिक बुक वाचून तो चित्रपट पाहिला. एकीकडे संपूर्ण चित्रपटसृष्टी या चित्रपटाची आणि त्यातील स्टारकिड्सची भरभरून प्रशंसा करत आहेत तर दुसरीकडे बरीच लोक या चित्रपटावर टीकाही करत आहेत. या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन झोया अख्तर आणि रीमा कागती यांनी मिळून केलं आहे. तर याचे संवाद फरहान अख्तरने लिहिले आहेत अन् याचं संगीत शंकर-एहसान-लॉय यांचं आहे.