Mirzapur Season 3 Review Rating: अमेझॉन प्राइम व्हिडीओवरील लोकप्रिय व बहुप्रतिक्षीत वेब सीरिज ‘मिर्झापूर’ चा तिसरा सीझन आज शुक्रवारी (५ जुलै) रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दुसऱ्या सीझननंतर तब्बल चार वर्षांनी या गाजलेल्या सीरिजचा चौथा भाग येणार अशी घोषणा निर्मात्यांनी केल्यापासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून सीरिज रिलीज झाली आहे. या नवीन सीझनमध्ये कालीन भैया आणि गुड्डू पंडित यांच्यात सत्तेसाठीचे डावपेच पाहायला मिळत आहेत. या सीझनबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, ते जाणून घेऊयात.
वाचा 'मिर्झापूर ३'बद्दल प्रत्येक अपडेट्स
"जिस शहर में तुम नौकर बन कर आए हो, मालिक है हम शहर के..." असं म्हणतानाचा कालीन भैया म्हणजेच पंकज त्रिपाठींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
https://twitter.com/imu07280300033/status/1809152125403869397
"मुन्ना भैया शिवाय मिर्झापूर मिर्झापूर नाही. पण पंकज त्रिपाठी सर्वोत्तम अभिनेते आहेत," अशी पोस्ट एका चाहत्याने केली आहे.
https://twitter.com/bagwan_kamran/status/1809135800832893398
'पंचायत'च्या सचिव जींची एंट्री 'मिर्झापूर ३' मध्ये झाली. अली फजलने खुलासा केला होता की कालीन भैय्याच्या मृत्यूशी संबंधित काही पेपर वर्कसाठी येणाऱ्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत जितेंद्र कुमार दिसणार आहे. त्यानुसार, चाहते या सीरिजमध्ये जितेंद्र कुमारला पाहून खूपच आनंदी आहेत.
मिर्झापूर सीरिज मुन्ना भैय्याशिवाय मनोरंजक नाही, अशा पोस्ट चाहते सोशल मीडियावर करत आहेत.
https://twitter.com/Imanishsingh15/status/1809110484357976247
मिर्झापूर ३ सीरिज ऑनलाइन लीक झाल्याने निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. लोक एचडीमध्ये सर्व एपिसोड डाउनलोड करून पाहत आहेत. मिर्झापूर ३ मध्ये १० एपिसोड्स आहेत आणि प्रत्येक एपिसोड ४५ मिनिटांचा आहे.
'मिर्झापूर ३' मध्ये मुन्ना भैयाचे पात्र दाखवण्यात आलेले नाही. आधीच्या दोन सीझनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या मुन्ना भैयाची प्रेक्षकांना या सीझनमध्ये आठवण आली आहे.
रिचा चड्ढाने पती अली फजलच्या दमदार अभिनयाचं कौतुक करत त्याची चाहती असल्याचं म्हटलं आहे.
प्राइम व्हिडीओने इन्स्टाग्रामवर मिर्झापूर ३ चा नवीन व्हिडीओ शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/C9Bx7t7I_UJ/?utm_source=ig_web_copy_link
ही बहुप्रतिक्षीत सीरिज पाहिल्यावर प्रेक्षक सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत.
https://twitter.com/Abhishekgiri220/status/1809076272892428544