काही चित्रपटांच्या कथा इतक्या दमदार असतात की कितीही वर्षे झाली तरी त्याची क्रेझ प्रेक्षकांमध्ये असते. असाच एक १८ वर्षे जुना बॉलीवूड चित्रपट आहे, ज्याची कथा खूपच थ्रिलर होती. एक तरुणी आणि तिच्या दोन प्रियकरांवर बेतलेला चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. हा चित्रपट ओटीटीवर उपलब्ध आहे.

या चित्रपटाचं नाव ‘नकाब’ (Naqaab on OTT) आहे. हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. अब्बास-मस्तानने याची निर्मिती केली होती. हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा त्याला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. पण नंतर मात्र या सिनेमाचं कौतुक झालं.

‘नकाब’ मध्ये मुख्य भूमिकेत बॉबी देओल व अक्षय खन्ना होते. ‘एक दिन तेरी राहों में’ हे जावेद अलीने गायलेलं लोकप्रिय गाणं या चित्रपटातलं होतं. ‘नकाब’ डॉट द आय नावाच्या सिनेमापासून प्रेरित होता. या चित्रपटाची कथा श्रीराज अहमद व जितेंद्र परमार यांनी लिहिली होती.

नकाब चित्रपटाची कथा

नकाब चित्रपटात सोफिया (उर्वशी शर्मा) नावाची एक तरुणी असते. ती गोव्यात राहते. राकेश नावाचा एक नराधम तिच्यावर हल्ला करतो, त्यामुळे ती खूप घाबरते आणि कायमची दुबईला निघून जाते. दुबईत सोफियाची भेट करण ओबेरॉयशी (बॉबी देओल) होते. दोघे प्रेमात पडतात आणि ते लग्न करायचं ठरवतात. पण लग्नाआधी सोफियाची भेट विक्की मल्होत्राशी (अक्षय खन्ना) होते. सोफिया विक्कीकडे आकर्षित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोफिया करणला सोडते आणि विक्कीबरोबर राहू लागते. हे सगळं करणला बघवत नाही आणि तो आत्महत्या करतो. करणने आत्महत्या केल्याचं समजल्यावर सोफियाला धक्का बसतो. ती त्याच्या मृत्यूला स्वतःला जबाबदार धरते. पण या कथेतील सर्वात मोठा ट्विस्ट वेगळाच आहे. या कथेचा खलनायक सोफियाचा प्रियकरच असतो. तो विक्की आहे की करण? हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

‘नकाब’चा क्लायमॅक्स इतका जबरदस्त आहे की तुम्ही चक्रावून जाल. तुम्हाला जर हा रोमँटिक थ्रिलर चित्रपट पाहायचा असेल तर तो ओटीटीवर उपलब्ध आहे. ‘नकाब’ अमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे.