अलीकडच्या काळात लोकांचं ओटीटीवर चित्रपट पाहण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. कारण जगभरातील चित्रपट, वेब शो, मालिका सर्वच तुम्हाला घर बसल्या ओटीटीवर पाहता येतं. ओटीटीवर दर आठवड्याला नवनवीन कलाकृती रिलीज होतात, त्याच प्रमाणे त्या हटवल्याही जातात.

तुम्हाला ओटीटीवर चित्रपट पाहायला आवडत असतील आणि तुमच्याकडे नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन असेल तर तुमच्यासाठी एक बातमी आहे. नेटफ्लिक्सवरून जून महिन्यात काही चित्रपट हटवण्यात येणार आहेत. हे चित्रपट तुम्ही पाहिले नसतील तर आताच पाहू शकता, नंतर कदाचित ते तुम्हाला ओटीटीवर पाहता येणार नाहीत.

नेटफ्लिक्सवरून हटवण्यात येणाऱ्या चित्रपटांच्या यादीत अनेक गाजलेल्या सिनेमांचा समावेश आहे. या यादीतील दोन चित्रपट १ जूनला हटवण्यात आले आहेत, त्यामुळे ते तुम्ही पाहू शकणार नाही. इतर कोणते चित्रपट कधी हटवले जाणार आहेत, ते जाणून घ्या.

ब्रेन ऑन फायर

ब्रेन ऑन फायर हा चित्रपट १४ सप्टेंबर २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपटात सुसाना काहलन नावाची एक पत्रकार असते, ती दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरने ग्रस्त आहे. ती तिच्या शरीरावर आणि मनावरचे नियंत्रण गमावू लागते, त्यामुळे घडणाऱ्या गोष्टी या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. हा चित्रपट २२ जून रोजी नेटफ्लिक्सवरून हटवला जाणार आहे.

ट्रॅप

१ एप्रिल २०१९ रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. आता तो ११ जून रोजी नेटफ्लिक्सवरून हटवला जाईल.

कॅरोल

कॅरोल हा २०१५ चा ऐतिहासिक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. याचं दिग्दर्शन टॉड हेन्सने केलं होतं. १९५२ च्या द प्राइस ऑफ सॉल्ट या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे. हा चित्रपट १७ जून रोजी नेटफ्लिक्सवरून हटवला जाईल.

ऑर्डिनरी पीपल

२०१६ मध्ये आलेला १ तास ४७ मिनिटांचा ऑर्डिनरी पीपल हा चित्रपट २६ जून रोजी नेटफ्लिक्सवरून हटवला जाणार आहे.

अमेरिकन स्नायपर

अमेरिकन स्नायपर हा २०१४ आलेला सुपरहिट चित्रपट आहे. हा चित्रपटही तुम्हाला काही दिवसांनी ओटीटीवर पाहता येणार नाही. तो २१ जून रोजी नेटफ्लिक्सवरून हटवला जाईल.

टू वीक्स नोटिस

टू वीक्स नोटिस हा २००२ साली आलेला चित्रपट आहे. हा चित्रपट १ जून रोजी नेटफ्लिक्सवरून हटवण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मां

एक महिला किशोरवयीन मुलांसाठी दारू खरेदी करून आणण्यास तयार होते आणि त्यांना पार्टीसाठी तिचे तळघर देते. पण त्यानंतर जे घडतं ते भयंकर असतं. हा चित्रपट १ जून रोजी नेटफ्लिक्सवरून हटवण्यात आला आहे.