अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘आय सी ८१४: कंदहार हायजॅक’ ( IC 814: The Kandahar Hijack) ही वेबसीरिज २९ ऑगस्टला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. अभिनेता विजय वर्माने यामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. २४ डिसेंबर १९९९ ला पाच दहशतवाद्यांनी भारतीय विमानाला काठमांडूतून उड्डाण केल्यावर ४० मिनिटांनंतर ताब्यात घेतले होते.

इब्राहिम अथर, सनी अहमद काझी, झहूर इब्राहिम, शाहिद अख्तर आणि सय्यद शाकीर या पाच दहशतवाद्यांनी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या आय सी ८१४ विमानाचे अपहरण केले होते. प्रवासी आणि क्रू यांना आठ दिवस ओलिस ठेवण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी भारत सरकारकडे दहशतवादी मसूद अझहर, उमर शेख आणि मुश्ताक अहमद जरगर यांची तुरुंगातून सुटका करण्याची मागणी केली होती. प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्री जसवंत सिंग हे त्या दहशतवाद्यांना विशेष विमानाने कंदहारला घेऊन गेले होते. तिथे ओलिस ठेवलेले प्रवासी व क्रू आणि अतिरेकी यांच्यामध्ये देवाणघेवाण झाली.

Lakadganj police station is in discussion due to the controversial affairs
नागपूर : गंगाजमुनातील वारांगणा; पोलिसांचा छापा अन् ग्राहकांची पळापळ…
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Bhoomipujan of Naina projects tomorrow by Prime Minister
नैना’प्रकल्पांचे उद्या भूमिपूजन, पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनानंतर शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता
Cyber ​​thieves cheated people, Pune, Cyber ​​thieves,
पुणे : सायबर चोरट्यांकडून दोघांची ५७ लाखांची फसवणूक
sri lanka president leftist leader anura kumara dissanayake
लेख : श्रीलंकेसाठी ‘ग्रीक’ धडे!
mixers juicers and tabs distribution to bandra women
‘खनिज क्षेत्र’ निधीतून मिक्सर, टॅबचे वाटप; खाणकाम उद्योगाने बाधित झालेल्यांचा निधी इतरत्र वळवण्यास विरोध
Tupperware bankruptcy
Tupperware Bankrupt: रंगीबेरंगी डब्याची, बाटल्यांची कंपनी डब्यात; टपरवेअरने जाहीर केली दिवाळखोरी
bachchu kadu on ajit pawar faction mla
Bachchu Kadu : “अजित पवार गटाचे अर्ध्याहून अधिक आमदार…”; प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचा मोठा दावा!

यावर आधारित ‘आय सी ८१४: कंदहार हायजॅक’ ही वेबसीरिज असून २९ ऑगस्टला ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे.

काय म्हणाले नेटकरी?

या वेबसीरिजमध्ये दहशतवाद्यांची नावे शंकर आणि भोला अशी ठेवण्यात आली आहेत. हे पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. अनेक नेटकऱ्यांनी एक्सवर पोस्ट शेअर करीत लिहिले, निर्मात्यांनी एका विशिष्ट समुदायाशी संबंधित दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी अपहरणकर्त्यांची नावे बदलून शंकर आणि भोला अशी ठेवली आहेत. अनेकांनी बॉयकॉट नेटफ्लिक्स, बॉयकॉट बॉलीवूड, बॉयकॉट आय सी ८१४ असे हॅशटॅग वापरत अनुभव सिन्हा यांनी तथ्यांचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. एका एक्स वापरकर्त्याने, दहशतवाद्यांची कृत्ये चांगली दाखवून हिंदू समुदायाला बदनाम करण्याचे काम अनुभव सिन्हाने केल्याचे म्हटले आहे.

आता यावर प्रतिक्रिया देताना कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत लिहिले, “अपहरणकर्त्यांच्या नावाविषयी अनेक ट्विट मी वाचत आहे. आम्ही योग्य पद्धतीने संशोधन केले आहे. दहशतवादी एकमेकांना खोट्या नावाने अथवा टोपणनावाने बोलवत असत.”

पुढे ते म्हणतात, “या कलाकारांवर प्रेम केल्याबद्दल, त्यांना प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. अनुभव सिन्हाने विश्वास दाखवला आणि स्वातंत्र्य दिले, त्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानतो”, अशी पोस्ट मुकेश छाब्रा यांनी शेअर केली आहे.

हेही वाचा: “त्याने मला त्याच्या शोमध्ये गायला बोलवलं आणि…”, अभिजीत सावंतने सांगितलेली शाहरुख खानबद्दलची ‘ती’ आठवण

IC 814: द कंदहार हायजॅकमध्ये विजय वर्मा, नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, कुमुद मिश्रा, अरविंद स्वामी, दिया मिर्झा आणि पत्रलेखा यांसह इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.