OTT Release This Week: ऑगस्टचा पहिला आठवडा सिनेप्रेमींसाठी खूप खास असणार आहे, कारण या वीकेंडला रक्षाबंधन आहे. दुसऱ्या दिवशी रविवार आहे. वीकेंडला बरेच जण घरी राहून सण साजरा करणं पसंत करतात. ज्यांचा वीकेंडचा काही प्लॅन नसेल ते घरी राहून चित्रपट आणि वेब सीरिज पाहतात. तुमचाही जर काही प्लॅन नसेल तर या आठवड्यात रिलीज होणारे चित्रपट व सीरिज तुम्ही घरबसल्या पाहू शकता. या आठवड्यात ओटीटीवर नवीन काय पाहायला मिळणार? ते जाणून घेऊयात.
Wednesday Season 2
Wednesday Season 2 on Netflix : ‘Wednesday’ ही एक गाजलेली हॉलीवूड सीरिज आहे. याच्या दुसऱ्या भागाची चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत होते, कारण पहिला सीझन सुपरहिट ठरला होता. आता निर्मात्यांनी Wednesday चा दुसरा सीझन आणला आहे. Wednesday Season 2 ही सीरिज ६ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या वीकेंडला ओटीटीवर काय पाहावं, असा विचार करत असाल तर Wednesday Season 2 तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.
सलाकार
Salakaar on JioHotstar : ‘सलाकार’ ही एक वेब सीरिज आहे. यात अभिनेता नवीन कस्तूरिया एका भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी काय काय करतो, ते या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. नवीनबरोबरच यात अभिनेत्री मौनी रॉय व अभिनेता मुकेश ऋषी यांनीही महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. ही सीरिज ८ ऑगस्टपासून जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.
अरबिया कदली
Arabia Kadali on Prime Video : व्ही व्ही सूर्य कुमार दिग्दर्शित ‘अरबिया कदली’ हा चित्रपट तुम्ही वीकेंडला पाहू शकता. यात सत्य देव व आनंदी यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाची कथा मच्छिमारांच्या भोवती फिरते. हा चित्रपट ८ ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
बिंदिया के बाहुबली
Bindiya Ke Bahubali on OTT: ‘बिंदिया के बाहुबली’ ही सीरिज एमएक्स प्लेयरवर ८ ऑगस्ट रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे. यामध्ये सौरभ शुक्ला व रणवीर शौरीसह अनेक कलाकार दिसणार आहेत. ही एक डार्क गँगस्टर कॉमेडी सीरिज आहे.
काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला होता, ज्याला चांगले व्ह्यूज मिळाले आहेत.