‘पंचायत ३’ सीरिज २८ मे रोजी अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाली आहे. पहिल्या दोन सीझनप्रमाणेच तिसरा सीझनही खूप गाजतोय. फुलेरा गाव, एक सचिव, प्रधान अन् गावातलं राजकारण यावर आधारित ही सीरिज सर्वात लोकप्रिय सीरिजपैकी एक आहे. यात जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर सिंह, फैजल मलिक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. पण याबरोबरच एक पात्र आहे, जे खूप गाजलं, ते म्हणजे भूषण होय. त्याच्या ‘देख रहे हो बिनोद’ या डायलॉगवर शेकडो मीम्सही झाले आहेत.

भूषणची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचं नाव दुर्गेश कुमार आहे. ‘पंचायत’मध्ये दुर्गेश कुमारने साकारलेला भूषण फुलेरा गावातील सत्ताधाऱ्यांचा विरोध करण्यासाठी कारण शोधत असतो. निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनमध्ये हे पात्र आणलं होतं, या पात्राला खूपच लोकप्रियता मिळाली. पण दुर्गेश कुमारचा या ‘स्टारडम’पर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्याच्या या प्रवासावर एक नजर टाकुयात.

हिरवी पैठणी, नाकात नथ अन् चंद्रकोर, Cannes च्या रेड कार्पेटवर मराठी लूकमध्ये अवतरलेली ‘ती’ कोण? जगभरात होतेय चर्चा

बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात जन्मलेल्या दुर्गेशने शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि दिल्ली गाठली. दिल्लीत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये थिएटर शिकत असताना तो एका शाळेत शिकवायला जायचा. मुंबईत आल्यानंतर त्याने ‘हायवे’ सिनेमात छोटीशी भूमिका करून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. नंतर त्याला काम मिळालं, पण सर्व भूमिका लहान होत्या. हा काळ त्याच्यासाठी खूप संघर्षाचा होता. २०१३ ते २०२२ या नऊ वर्षांत दिलेल्या प्रत्येक ऑडिशनमध्ये अपयश आल्याचं दुर्गेश सांगतो. “कास्टिंग डायरेक्टर्स म्हणायचे की तुझ्यात प्रतिभा आहे पण ऑडिशनमध्ये ते दिसत नाही,” असं दुर्गेश म्हणाला होता.

४० फ्लॉप चित्रपट देऊनही ‘हा’ अभिनेता थाटात जगतो आयुष्य, तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या संपत्तीचा आहे मालक

या कठीण काळात काम मिळत नव्हतं आणि पैशांची गरज होती, त्यामुळे दुर्गेशला सॉफ्ट पॉर्न फिल्ममध्ये काम करावं लागलं होतं. “मी अभिनयाशिवाय जगू शकत नाही, मला माझ्या क्षमता माहित आहेत आणि स्वतःवर विश्वास असल्यामुळे मी माझ्या वाट्याला जी कामं आली ती केली,” असं दुर्गेश म्हणाला होता.

पहिलं लग्न मोडल्यावर वयाने लहान कृष्णाच्या प्रेमात पडली होती कश्मीरा शाह, अभिनेत्री ५२ वर्षांची, तर पती फक्त…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोना काळात मिळाली संधी

इतकी वर्षे संघर्ष केल्यावर अखेर दुर्गेशला करोना काळात काम मिळालं. त्याला ‘पंचायत २’ मध्ये भूषणच्या भूमिकेसाठी घेण्यात आलं. आता तिसऱ्या सीझनमध्येही दुर्गेशची भूमिका खूप मोठी आहे. ओटीटीमुळे काम मिळत असल्याने दुर्गेशने आनंद व्यक्त केला आहे. “आम्हाला आता काम मिळत आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर, आम्ही काय केलं असतं, ॲक्शन शोमध्ये आम्हाला कोणी घेत नाही. कमीत कमी कॉमेडीमुळे आम्हाला अशा संधी मिळतात त्यामुळे खूप चांगलं वाटतंय,” असं दुर्गेश म्हणाला.