OTT Releases This Week : या आठवड्यात ओटीटीवर भरपूर मनोरंजन होणार आहे. २२ जून ते ३० जूनदरम्यान नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व हॉटस्टार यांसारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक मनोरंजक चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. चला तर मग त्यांच्या रिलीज डेट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मची नावे जाणून घेऊ…
हेड ओव्हर हिल्स
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ २१ जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर सुरू झाला आहे, जो तुम्हाला नक्कीच आवडेल. पण, तुम्हाला वेगळा कॉमेडी शो बघायचा असेल, तर ‘हेड ओव्हर हिल्स’ २३ जून रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या शोचे चाहते खूप मोठे आहेत आणि म्हणूनच त्याची वाट पाहिली जात आहे.
पंचायत सीझन ४
फुलेरा गावातील प्रत्येक पात्र प्रत्येक घरात लोकप्रिय झाले आहे. ही कथा इतकी मनोरंजक आहे की, मागील सीझन संपताच लोक पुढच्या सीझनची वाट पाहू लागतात. ‘पंचायत’ या वेब शोचा चौथा सीझन २४ जूनपासून अमेझॉन प्राइमवर सुरू होईल.
काउंटडाऊन
काउंटडाऊनचा पहिला सीझन २५ जून रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. ही कथा एका विशेष टास्क फोर्सची आहे, जी एका विशेष मोहिमेवर पाठविण्यात आली आहे. थ्रिलर आणि अॅक्शनने भरलेली ही वेब सीरिज तुम्हला खूप आवडेल.
आयर्न हार्ट
ज्यांना सुपरहीरो चित्रपट आणि मालिका पाहण्याची आवड आहे त्यांच्यासाठी ‘आयर्न हार्ट’ २५ जून रोजी जिओ हॉटस्टारवर येत आहे, ज्याची कथा मुलांबरोबरच प्रौढांनाही आवडेल अशी आहे. मार्वलचे चाहते बऱ्याच काळापासून या शोची वाट पाहत आहेत.
रेड-२
जर तुम्ही अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्यातील जबरदस्त टक्कर चित्रपटगृहात पाहण्याची संधी हुकली असेल, तर आता तुम्ही त्यांचा सुपरहिट चित्रपट रेड-२ २७ जून रोजी नेटफ्लिक्सवर बघू शकता.
स्क्विड गेम सीझन ३
स्क्विड गेमची कहाणी अखेर ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर संपत आहे. कारण या शोचा संभाव्य शेवटचा सीझन २७ जूनपासून प्रीमियर होणार आहे.