‘बिग बॉस ओटीटी ३’चे पर्व सध्या खूपच गाजताना दिसत आहे. अनिल कपूर सूत्रसंचालन करीत असलेल्या या पर्वाची सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चा होत असते. कधी बिग बॉसने दिलेला टास्क, कधी सदस्यांचे भांडण, तर कधी या घरातील स्पर्धकांचे वैयक्तिक आयुष्य यांमुळे हे कलाकार सातत्याने चर्चांचा भाग बनत आहेत. आता ‘बिग बॉस ओटीटी ३’मधील सतत चर्चेत असणारा स्पर्धक अरमान मलिक त्याच्या पहिल्या पत्नीने म्हणजेच पायल मलिकने केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.

अरमान मलिकबरोबरच्या नात्यावर काय म्हणाली पायल?

पायल मलिक ही एक यूट्यूबर आहे. तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या यूट्यूब व्हिडीओमध्ये तिने अरमानबरोबरच्या नात्याबद्दल वक्तव्य केले आहे. तिने म्हटले आहे की, जेव्हा अरमान आणि क्रितिका बिग बॉसच्या घरातून बाहेर पडतील तेव्हा मी त्यांच्याशी बोलून अरमानपासून वेगळी होईन. ते घरात आहेत, त्यांना माहीत नाही की बाहेरच्या जगात काय चालू आहे. लोक किती वाईट प्रकारे बोलत आहेत. तिरस्कार करीत आहेत. एक घरात दोन बायका असतील, तिघांचा संसार असेल, तर ते लोकांना पटत नाही. याचा आता मला त्रास होतोय आणि पुढे मुलांना होईल. लोक त्यांना वाटेल ते बोलतील. मला ते सगळं नको आहे. त्यामुळे जेव्हा क्रितिका आणि अरमान बाहेर येतील, तेव्हा आम्ही वेगळे राहू, असे पायलने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

पायल मलिकदेखील अरमान व क्रितिका यांच्याबरोबर बिग बॉस ओटीटीची स्पर्धक होती; मात्र तिला बाहेर पडावे लागले. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर तिनं आम्ही तिघं एकत्र खूश आहोत, असे वक्तव्य केले होते.

हेही वाचा: नाटय़रंग: ‘पत्रापत्री’जगण्यातील विसंगतींची खुसखुशीत चित्रं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पायल मलिक ही अरमान मलिकची पहिली पत्नी आहे. अरमानने पायलला घटस्फोट न देता, क्रितिकाशी दुसरे लग्न केले आहे. अरमान, पायल व क्रितिका एकत्र राहतात. जेव्हा हे तिघे बिग बॉसच्या घरात आले होते. त्यावेळी सोशल मीडियावर बहुपत्नीत्वाचा वाद खूपच रंगला होता. त्याबरोबरच अरमान मलिक बिग बॉसच्या घरातील भांडणामुळे सतत चर्चेत असतो. क्रितिकावर टिप्पणी केल्याच्या वादातून त्याने विशाल पांड्येच्या कानाखाली मारली होती. त्यानंतरदेखील घरात आणि घराबाहेर चांगलाच वाद रंगला होता. बिग बॉसच्या जुन्या पर्वातील सदस्यांनी अरमान मलिकने सर्वांत मोठा नियम मोडला असून, त्याला घराबाहेर काढण्याची मागणी केली होती; मात्र तसे काही घडल्याचे पाहायला मिळाले नाही. आता बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वात कोणता स्पर्धक प्रेक्षकांचे मन जिंकून घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.