मागील काही वर्षांमध्ये ओटीटीवर इतके दमदार चित्रपट व सीरिज आल्या आहेत की मोठे स्टार्स व भरमसाठ बजेट नसूनही त्यांनी दमदार कामगिरी केली. ‘पंचायत’ व ‘गुल्लक’ सारख्या सीरिजमध्ये साध्या- सरळ सामान्य लोकांच्या जीवनावरील कथांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. तर काही अशा सीरिज आल्यात ज्या सत्य घटनेवर आधारित होत्या.
सत्य घटनेवर बेतलेली अशीच एक सीरिज आहे. या सीरिजमध्ये अभिनेता प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत आहे. या सीरिजमध्ये शेअर बाजारातील घोटाळा दाखवण्यात आला आहे. प्रतीक गांधी सध्या ‘सारे जहां से अच्छा’ मुळे चर्चेत आहे. याचदरम्यान त्याच्या या सीरिजची प्रेक्षकांना पुन्हा एकदा आठवण झाली आहे.
हंसल मेहता दिग्दर्शित ‘स्कॅम 1992’ ही सीरिज भारतातील सर्वात मोठ्या शेअर बाजार घोटाळ्यावर आधारित आहे. यामध्ये प्रतीक गांधीने स्टॉक ब्रोकर हर्षद मेहताची भूमिका साकारली होती. त्याच्याबरोबर श्रेया धन्वंतरी, हेमंत खेर आणि शादाब खान हे कलाकारही या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले. १९९२ साली झालेल्या या आर्थिक घोटाळ्याने त्यावेळी संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. या सीरिजची कथा हर्षद मेहताच्या सामान्य जीवनापासून ते त्याचा ‘बिग बुल’ बनण्याचा प्रवास दाखवते. ही सीरिज सत्य घटनेवर आधारित आहे.
‘स्कॅम 1992’ ची कथा काय?
या सीरिजची कथा पूर्णपणे हर्षद मेहताच्या आयुष्यावर बेतलेली आहे. त्याचे वडील कपड्यांचा व्यवसाय करायचे, पण व्यवसाय बंद पडल्यानंतर कुटुंब आर्थिक संकटात अडकले. त्यानंतर हर्षद शेअर बाजाराकडे वळते, इथे तो नियमांची पर्वा न करता हळूहळू पुढे जातो आणि बाजारात आपली पकड मजबूत करतो. मग तो त्याच्या भावाबरोबर एक कंपनी सुरू करतो. मनी मार्केटमध्ये प्रवेश केल्यानंतर बँकांशी त्याचे व्यवहार सुरू होतात, परंतु एका पत्रकाराला त्याच्या कारनाम्यांची माहिती मिळते आणि एक मोठा घोटाळा उघड होतो.
हंसल मेहता यांनी ही सीरिज इतक्या बारकाईने आणि रोमांचक पद्धतीने पडद्यावर आणली आहे की प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटच्या भागापर्यंत ही सीरिज खिळवू ठेवते.
‘स्कॅम 1992’ ला IMDb वर किती रेटिंग मिळाले?
तुम्हाला ‘स्कॅम 1992’ ही सीरिज पाहायची असेल तर ती ओटीटीवर उपलब्ध आहे. तुम्ही ती घरबसल्या SonyLIV वर पाहू शकता. ‘स्कॅम 1992’ ही फक्त भारतातील नव्हे तर जगभरातील टॉप रेटेड सीरिज आहे. या सीरिजला आयएमडीबीवर ९.३ रेटिंग मिळाले आहे. हे रेटिंग प्रेक्षकांनी दिले आहे, यावरून या सीरिजची लोकप्रियता दिसून येते.